पाचोरा येथे प्रांताधिकारी शासकीय निवासस्थानाचे शनिवारी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते उदघाटन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२२
(घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती.)
शासकीय कर्मचारी कोणत्याही विभागातील असो ते त्यांचे कर्तव्य बजावत असतांना कधी कार्यालयात बसून तर वेळप्रसंगी तासंतास बाहेर फिरुन उन, वारा, पाऊसात आपली सेवा इमानेइतबारे बजावतात असतात. आपले कर्तव्य पार पाडतांना दिवसभर येणारा मानसिक ताण तसेच शारीरिक श्रम करुन घरी पोहचल्यावर घरी म्हणजे आपल्या निवासस्थानी गेल्यावर निवांत बसून थकवा घालवण्यासाठी जर व्यवस्थित निवासस्थान नसेल तर मग सहजच मानसिक व शारीरिक ताण येऊन यातुन नैराश्य व शारीरिक व्याधी जडतात व यामुळे कितीही सक्षम अधिकारी किंवा कर्मचारी असले तरी ते इच्छा असूनही कामकाज करु शकत नाही. व जर अधिकारी व कर्मचारी व्यवस्थीत कामकाज करु शकले नाहीत तर नक्कीच याचा परिणाम तालुक्याच्या विकासावर होतो.
नेमकी हीच बाब हेरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुखसोयींसाठी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवासस्थान असावे तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू केला असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.
याचीच फलनिष्पत्ती झाली असून पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे व तत्कालीन प्रांताधिकारी मा. श्री. राजेद्रजी कचरे साहेब यांच्या कार्यकाळात सुमारे ५९ लाख रुपये खर्चून पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात प्रांताधिकारी निवासाचे बांधकाम पूर्ण झाले असून या निवासस्थानाचे उद्घाटन दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या उध्दघाटन प्रसंगी पाचोराचे प्रांताधिकारी डॉ. मा. श्री. विक्रमजी बांदल, तहसीलदार मा. श्री. कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मा. श्री. मुकेश हिवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मा. श्री. दीपक पाटील, मा. श्री. शेलार, उपअभियंता मा. श्री. काजवे,अभियंता,उद्योगपती मुकुंद बिलदीकर,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हाप्रमुख मा. श्री. रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख मा. श्री. सुनील पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. पदमसिंग पाटील, माजी जिल्हा उपप्रमुख मा. श्री. गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष मा. श्री. शरद पाटे, बाजार समितीचे माजी संचालक मा. श्री. शिवदास पाटील, मा. श्री. अनिल धना पाटील, डॉ. मा. श्री. भरत पाटील, माजी सभापती मा. श्री. पंढरीनाथ पाटील, शहर प्रमुख मा. श्री. किशोर बारावकर, मा. श्री. बंडू चौधरी, मा. श्री. प्रवीणजी ब्राह्मणे यांचे सह सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.