जि. प. प्राथमिक विद्यामंदिर कोल्हे येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर बॅग, पाणी बाटली व शालेय साहित्याचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०७/२०२२
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनाशी बाळगून कोल्हे येथील बाफना परिवाराच्या वतीने स्व. आई, वडील, भाऊ यांच्या स्मृतिपित्यार्थ कोल्हे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पाण्याची बाटली, शालेय दप्तर (बॅग) व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम ॲडव्होकेट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट मा. श्री. अभय दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मा. श्री. अभय पाटील,ॲडव्होकेट मंगेशराव गायकवाड, केंद्रप्रमुख श्री. शांताराम कुंभार व मान्यवरांच्या हस्ते श्री. सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवर मंडळीचा सत्कार करण्यात आला. तसेच कोल्हे येथील प्राथमिक विद्यामंदिरात कार्यरत असलेले शिक्षक श्री. जयवंत पाटील, श्री. प्रशांत बडगुजर, श्री. शेख व श्री. राठोड यांच्या गाडीला मोठा अपघात झाला होता. त्या अपघातातून त्यांचा पुनर्जन्म झाला म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक बाफना कृषी व विद्याप्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रमेशचंद्रजी बाफना, केंद्र प्रमुख श्री. शांताराम कुंभार व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मा. श्री. अभय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच शिस्तीचे महत्त्व पटवून देत महापुरुषांच्या जीवनावरील साहित्य वाचण्यासाठी सांगितले.
याप्रसंगी शामकांत वाघ, प्रवीण जोहरने, शकुर तडवी, सतीश गोपाळ, कोल्हे गावचे सरपंच, माजी सरपंच, आजी, माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, सभासद, पोलीस पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, कोल्हे येथील ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.