पिंपळगाव हरेश्र्वर येथे १७ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणारा १७ वर्षीय गौरव सुनील बडगुजर हा दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी वडीलांसोबत शेतात काम करण्यासाठी गेला होता. शेतात काम करत असतांनाच त्याच्या पायाला काहीतरी चावल्याची गौरव यास जाणिव झाली. व तो काही सांगण्याच्या आताच शेतातच चक्कर येऊन खाली पडला हे दृष्य पाहून गौरवच्या वडीलांनी त्याला तातडीने पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता गौरवची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने पाचोरा येथे पाठविण्यात आले.

गौरव याच्यावर दिनांक २६ सप्टेंबर पासून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच आज दिनांक ०४ ऑक्टोबरची सकाळ ही गौरवच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली व सकाळी सात वाजता गौरवची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली व त्याला मृत्यूने कवटाळले ही वार्ता पिंपळगाव हरेश्र्वर गावात माहीत पडताच बडगुजर परिवारासह गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या