स्व.स्वप्निल ललवाणी स्मृती दिन मातोश्री व्रुध्दाश्रम व म.गांधी विद्यालयात सामाजिक, शैक्षणीक कार्याने संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२२

भुसावळ येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डाॅ. डी. एम. ललवाणी यांचे कनिष्ठ सुपुत्र स्व. स्वप्निल यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून त्यांनी या स्मृती दिनाचे औचित्य साधून, त्याचे गुरुवर्य असलेले प्रा. गोविंद एम. महाजन हे भादली येथील महात्मा गांधी विद्यालयाचे चेअरमन आहेत. त्या विद्यालयाला कार्यालयीन कामकाजासाठी कपाट देऊन शैक्षणिक योगदान दिले.

याप्रसंगी चेअरमन प्रा. गोविंद महाजन यांनी त्यांचा लाडका विद्यार्थी स्वप्निलच्या स्म्रुती कथन करतांना अनेक किसे सांगितले. तसेच त्याची कार्यक्षमता, कार्यतत्परता, हुशारी व चपलकपणा या आठवणींना उजाळा दिला. मी माझा एक मानसपुत्र गमावला असल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी त्यांना गहिवरून आले होते, व उपस्थितांच्या डोळ्यातून ही आसवांनी वाट मोकळी केली होती. या कार्यक्रमाला ललवाणी परिवारात चे सदस्य मदनलाल ललवाणी, प्रा. डाॅ. दिलीप व नलिन ललवाणी, सहसचीव राजेंद्र कोल्हे तसेच मुख्याध्यापक धनगर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तदनंतर जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रमामध्ये स्वप्निलच्या स्मृती प्रित्यर्थ जेवण देण्यात आले व तसेच सर्व आजी आजोबांना फळे देण्यात आली. ललवाणी परिवाराने आजी आजोबांसोबत आपला वेळ व्यतीत करुन त्यांच्याशी हितगुज केले. व्रुध्दांची घेतली जाणारी काळजी, निगा, संगोपन व दिली जाणारी सेवा बघुन डाॅ. डि. एम. ललवाणी यांनी यापुढे हि यथाशक्ती मदतीचे आश्वासन दिले. याप्रसंगी वृद्धाश्रमाचे सह प्रकल्प प्रमुख श्री. संजय काळे यांनी स्वप्निलच्या फोटोला माल्यार्पण करून त्याबद्दल सहवेदना व्यक्त केली.

मदनलाल ललवाणी, दिलीप ललवाणी, नलीन ललवाणी, आदेश ललवाणी, सौ.शोभा ललवाणी, सौ.सपना ललवाणी यांनी वाढपीची सेवा ही दिली. या कार्यक्रमासाठी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक पवन येपुरे यांनी अनमोल मदत केली.

ब्रेकिंग बातम्या