कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारांना कठोर शासन झालेच पाहिजे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला गावातीलच ५ ते ६ मुलांनी अचानकपणे उचलून नेत शेतात घेऊन गेले व तेथे त्यांनी तीला जीवे मारण्याची धमकी देत त्या मुलीवर जोर, जबरदस्तीने अत्याचार केले व ही हकीकत कुणालाही सांगीतल्यास याद राख अशी धमकी देऊन सकाळी, सकाळी तिन विजेच्या सुमारास त्यांनी तीला महिलांच्या शौचालयाजवळ सोडून ते पळून पळ काढला या माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यापासून परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पंचक्रोशीतील गावातून व महाराष्ट्रभरातून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली जात आहे.
या घटनेची दखल घेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मा. श्री. भानुदास विसावे, राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. आ. नानासाहेब बबनरावजी घोलप यांनी तिव्र शब्दात निषेध केला असून आरोपींना कठोरात, कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे. तसेच यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हाध्यक्ष मा. श्री. उत्तमराव दौलत मोरे, राज्य सदस्य मा. श्री. दादासाहेब धनराज पवार, श्री. मनोज पवार श्री. ईश्वर आहिरे, श्री. रमेश पवार, श्री. गोवर्धन जाधव, श्री. समाधान लोखंडे, श्री. रिजीव सर, श्री. आय. एस. आहिरे, श्रीमती लाताबाई आहिरे, सौ. योजना पाटील, सौ. सुरेखा दिलीप वाघ, वरखेडी येथील समाजसेवक श्री. फकिरा गांगे, दिलीप आहिरे, श्री. मिलिंद आहिरे, श्री. विनोद खरे, श्री. नितीन तायडे, श्री. वसंत वाघ (गुरुजी), श्री. राजु सावंत अश्या जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. किसनराव नजनपाटील यांना निवेदन देऊन आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
ही मागणी करतांना पिडीत मुलीस व तीच्या परिविराला त्वरित मदत मिळवून द्यावी, गुन्ह्याची सखोल व काटेकोरपणे चौकशी होऊन आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी, हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात, कठोर म्हणजे मरेपर्यंत जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली असून तपासात दिरंगाई केल्यास आम्ही राज्यभरातून तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.