नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने साकडे.

दिलीप पाटील.(नाशिक)
दिनांक~०४/१०/२०२२
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दादाजी भुसे साहेबांच्या कार्यालयात जाऊन अपंग जनता दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक ०४ ऑक्टोंबर २०२२ मंगळवार रोजी भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी संजय गांधी समितीमध्ये एक दिव्यांग सदस्याची नेमणूक करण्यात यावी, नाशिक जिल्ह्यातील उच्च शिक्षण झालेल्या दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, मालेगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वंतंत्र दिव्यांग भवन निर्माण करण्यात यावे, मालेगाव तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या जमिनी देखील हडपल्या जात आहेत तसेच पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे याकडे लक्ष देऊन अपंगांच्या हडप करण्यात आलेल्या जमीनी परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर अशोक पाटील, मालेगाव तालुका सचिव अरूण शिवाजी खैरनार, मालेगाव तालुका संपर्क प्रमूख समाधान रमेश बच्छाव, मालेगाव तालुका कार्याध्यक्ष तुषार प्रभाकर पवार, मालेगाव तालूका ग्रामीण संघटक जयेश नारायण चव्हाण, मालेगाव तालुका सल्लागार वसंत जनार्दन चव्हाण आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.