वर्दीतील साहित्यिक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे १३ जूलै बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता जळगाव आकाशवाणीवर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२२
जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे जळगाव यांचा नुकताच ‘हुंकार वेदनेचा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्या पार्श्वभूमीवर जळगाव आकाशवाणीचे प्रसिद्ध निवेदक विजय भुयार यांनी ‘स्पंदन’ या लोकप्रिय कार्यक्रमात अहिरे यांची मुलाखत घेतलेली आहे. सदरचा कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्रातून दिनांक १३ जुलै २०२२ बुधवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रसारित होणार आहे.
कार्यक्रमांमध्ये अहिरे यांनी सर्वसाधारण पोलीस ते वर्दीतला दर्दी साहित्यकाचा प्रवास तसेच ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्र लिखाणाची प्रेरणा यासह आपल्या जीवनात सुदृढ आरोग्याचे महत्त्व या विषयावर भाष्य केलेले आहे. त्याचबरोबर
“धैयाचे शस्त्र घेऊनी उतरलो रण मैदानी
खाकीच्या धाग्यांनी विणली ही नवी कहाणी”
या सारख्या पोलिसांच्या शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या कवितांची मेजवानी देखील रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. विनोद अहिरे यांचे या अगोदरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं देशातील पहिले पुस्तक ‘मृत्यू घराचा पहारा’ हे प्रचंड गाजलेलं आहे. सदरचा कार्यक्रम जास्तीत जास्त श्रोत्यांनी श्रवण करावा असे आवाहन जळगाव आकाशवाणीने केलेलं आहे.
९८२३१३६३९९