अंबे वडगाव येथे जलवाहिनीची भरपावसात दुरुस्ती.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावातील पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन ठिकठिकाणी नादुरुस्त व पाइपलाइनच्या व्हॉल्व मध्ये बिघाड होऊन तसेच ठिकठिकाणी गळती लागल्याने ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांनी याची त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेतले असून भरपावसात पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू आहे.
ग्रामसेवकांनी ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत पाइपलाइनची त्वरित दुरुस्ती केल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकांचे आभार मानले आहेत. तसेच गावात ठिकठिकाणी मुरुम टाकणे, भररस्त्यावर केलेले अतिक्रमण काढणे, पथदिवे सुरु करणे ही कामे त्वरित करावीत अशी मागणी होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.