दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२२

पाचोरा तालु्क्यातील निपाणे येथील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, स्मशनभूमी सर्व समाज घटकांनसाठी खुली करावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी आज निळा सागर एकवटलेला पहावयास मिळाला.

तालुक्यातील निपाणे येथील घटनेतील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅथर सेना दीपक केदार यांचे नेतृत्वात सकल आंबेडकरी समाज, व सामाजिक संघटना तर्फे पाचोरा शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील जारगाव चौफुलीपासून बस स्टॅण्डरोड, शिवाजी नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसिल कार्यालया पर्यंत जोरदार घोषणाबाजी करत हा विशाल मोर्चा शिस्तप्रिय मार्गाने तहसील कार्यालयावर येऊन धडकला. सदर घटने बाबत न्याय मिळण्यासाठी आपला आवाज शासन,पोलीस यंत्रणा, प्रस्थापित राजकीय पक्ष,नेते यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.


स्वातंत्र्यानंतर देशाने ७५ गाठली तरीही आज काही मनुवादी वृत्तीचे लोक जातीभेद करताना दिसत आहे राखेला आणि पाण्याला जात नसते तरी काही सामाजिक अपप्रवृत्ती लोकं आज जातीय तेढ निर्माण होईल अशी वागणूक इतर समाज बांधवांना देत आहे असे निपाने येथील घटनेवरून दिसून येत आहे. विरोध हा कुठलाही एका समाजाला नसून हा मनोवादी वृत्ती असलेल्या लोकांना आहे. वेळीच अशांच्या बंदोबस्त नाही झाला तर भविष्यातही अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात असे आपल्या भाषणातून वक्त्यांनी स्पष्ट केले.पोलीस प्रशासनाने ही गांभीर्याने पाऊले उचलून आरोपींना अटक करावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आमचे आंदोलन असून गरज भासल्यास हे मंत्रालयापर्यंतही धडकवनार असा गर्भित इशारा या प्रसंगी त्यांनी दिला व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पहूर यांना यावेळी निवेदन सादर करून सदर मोर्चा विसर्जित करण्यात आला.


संपूर्ण व्हिडिओ सबस्क्राईब करा.