पशुपर्यवेक्षकांच्या कामबंद आंदोलनाने कुऱ्हाड येथील गरिबी शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू. लाखो पशुधनाचे आरोग्य धोक्यात. पशुधनपालकांचा आंदोलनाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०७/२०२१
पशुपर्यवेक्षकांची पदविका बोगस ठरवून पात्रता नसतांना मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या पशुपर्यवेक्षकावर कारवाई करणारा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यभरातील पशुपर्यवेक्षकांनी राज्यभर कामबंद आंदोलन सुरु केले असल्याने महाराष्ट्र राज्यातील पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचाच फटका कुऱ्हाड येथील उत्तम पाटील यांना बसला असून त्यांच्या मालकीची अंदाजे विस हजार रुपये किंमतीची दुभती गाय उपचाराअभावी मरण पावली आहे.
याबाबत पशुधन मालकांनी दिलेली माहिती अशी की पावसाळ्याचे दिवस असल्याने सद्या सगळीकडे हिरवा चारा मुबलक झाला असल्याने आमच्या पाळीव गायी, म्हशी, बैल, बकऱ्या या जंगलात किंवा शेतात चरण्यासाठी जातात नेमके उन्हाळ्यात सुकाचारा खात असल्याने आता नेमका हिरवा चारा खाण्यात येत असल्याने चाऱ्यात व पाण्यात बदल झाल्यामुळे गुरांना अनेक आजारांची लागण होत आहे.
नेमके याच कालावधीत पशुपर्यवेक्षकांनी ऐनवेळी कामबंद करुन संप पुकारल्याने तसेच पशुधन विकास अधिकारी असलेले पशुवैद्यक दवाखाने पाचोरा, नगरदेवळळा, लोहारा, बांबरुड प्र.बो, पिंपळगाव हरेश्वर, नांद्रा, वरखेडी तसेच पशुपर्यवेक्षकस्थीत दवाखाने लोहटार, अंबे वडगाव, सातगाव, नेरी व गाळण या गावांना आहेत.परंतु शासनाने नियुक्त केलेले मान्यताप्राप्त पशुवैद्य आपल्या नेमणूकीच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयात रहात नसल्याने व पशुपर्यवेक्षकांनी कामबंद आंदोलन पुकारले असल्याने उपचाराअभावी आमची लाखो रुपये किंमतीची पाळीव जनावरे (पशुधन) मातीमोल असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच पाचोरा तालुक्यातील पशुधनाची आकडेवारी गाय,बैल ४४१९१, म्हैसवर्ग २४६३२,शेळ्या २७१८८, घोडे ८१, डुकरे २०३० इतकी असून १२७ गावातील या पशुधनाची आरोग्याची धुरा सांभाळण्यासाठी शासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नसल्याने पशुसंवर्धन करणे अडचणीचे ठरत असल्याचे मत पशुधनपालकांनी व्यक्त केले आहे.
पाचोरा तालुक्यातील परिस्थिती पाहता पाचोरा तालुक्यात नोंदणी कृत पशुवैद्य (५) आहेत. शासकीय व खाजगी (५) असून पदवीधारक शासकीय व खाजगी (९०) आहेत. तालुक्यात एकुण १२७ गावांचा समावेश असून आजपर्यंत या गावातून पदवीधारक स्वतंत्ररीत्या सेवा देत होते.
परंतु या जाचक कायद्यामुळे आता सेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्याने महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यवसायिक संघटना व खाजगी संघटनेने १६ जुलै शुक्रवारपासून कायद्याप्रमाणे कामबंद आंदोलन सुरु केले असल्याने याचा परिणाम गावागावातील सर्वसाधारण पशुपालकांना होत असून दुभती व पाळीव लाखो रुपये किंमती पाळीव जनावरे उपचाराअभावी मृत्यूमुखी पडत असल्याने निसर्गचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यासमोर अजून हे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून
पशु का पालकांना होणाऱ्या त्रासाची कैफियत पशुपालकांनी पाचोरा तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्याकडे मांडली असून याबाबत संघटनेचे जिल्हा सचिव डॉक्टर सुधाकर शेळके यांनी आमदारांना सविस्तर माहिती दिली आहे.
येत्या आठवड्यात शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपापली पाळीव जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे समोर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.