बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ रॅली कडे, निष्ठावंत शिवसैनिकांनी फिरवली पाठ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०७/२०२२
भडगाव, पाचोरा मतदार संघाचे बंडखोर आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी बंड करुन एकनाथराव शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर भडगाव, पाचोरा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांनी या बंडखोर आमदारांचा तिव्र शब्दात निषेध करत शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ दिनांक २५ जून २०२२ शनिवार रोजी भडगाव, पाचोरा शहरातील व दोघे तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. तर दुसरीकडे शिवसैनिकांच्या दुसऱ्या गटाने बंडखोर आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांची पाठराखण व समर्थन करत किशोर पाटील यांचे समर्थन करण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.
एका बाजूला बंडखोर आमदारांचा जाहीर निषेध व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. तर दुसरीकडे बंडखोर आमदार मा श्री. किशोर आप्पा पाटील यांचे समर्थन करणाऱ्या एका गटाने पाचोरा शहरातून रॅली काढून बंडखोर आमदारांची पाठराखण केली आहे.
या दोघही वेगवेगळ्या घटनांमुळे भडगाव, पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये दोन गट तयार झाले असल्याचे दिसून येत आहे. तसेच या गटबाजीत समर्थन व विरोध करतांना निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला होता. या घटनांमुळे बंडखोर व निष्ठावंत असा संघर्ष सुरू झाला असून निष्ठावंत शिवसैनिक संतप्त झाले आहेत.