पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला जनता दरबारात १२ तक्रारींचा निपटारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०७/२०२२
नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा व्हावा, जनतेला सहजपणे आपल्या तक्रारी पोलिसांकडे मांडून त्वरित निवारण करता यावे याकरिता कौटुंबिक वाद, शेतीचे वाद, शेत वहिवाट रस्त्याचे वाद, सामुहिक शेत बांधारा, घराच्या सामुहिक भिंतीचे तसेच इतर लहानमोठे वाद, वीवाद विकोपाला जाऊ नये म्हणून वाद लवकरात लवकर मिटवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने आज दिनांक ०२ जूलै २०२२ शनिवार रोजी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील पोलीस स्टेशनला जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते.
आज रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारात १२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या जनता दरबारात आलेल्या तक्रारींची दखल घेत त्या समजून घेत तक्रारदार व विरोधातील गैरसमज दूर करून तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेत दोघांना समजून सांगत मनातील समज, गैरसमज दूर करत तर काही तक्रारीचा दोघांच्या संमतीने निपटारा लावला अशी माहिती पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
याप्रसंगी पो. हे. कॉ. माळी दादा, पो. ना. शिवनारायण देशमुख. पो. हे. कॉ. राकेश खोंडे, पो. हे. कॉ. पांडुरंग गोरबंजार, पो. कॉ. ज्ञानेश्वर बोडखे पो. कॉ. दिपक पाटील, पो. कॉ. मुकेश लोकरे, पो. कॉ. पंकज सोनवणे, पो. कॉ. दिपक बडगुजर, पो. कॉ. संभाजी सरोदे, पो. कॉ.अमोल पाटील, पो. कॉ. प्रमोद वडीले, वाहन चालक दिपक अहिरे, म. पो. शि. योगिता ताई चौधरी, म. पो. शि. भावसार ताई शिपाई सागर सावळे,व पोलीस ठाण्याचे ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पिंपळगाव हरे परिसरातील गावामंधील सरपंच, उपसरपंच,सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव,व तरुण वर्ग उपस्थित होते.