वरखेडी येथील गुरांच्या बाजारासमोर वरखेडी ते लोहारी दरम्यान वर वाहतुकीची कोंडी, मोठ्या अपघाताची शक्यता वाहनांवर कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा अंतर्गत उप बाजार समिती वरखेडी येथे दर गुरुवारी गुरांचा आठवडे बाजार भरतो वरखेडी येथील गुरांचा बाजार हा गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या बाजारात जातीवंत गायी, म्हशी तसेच बैल मोठ्या संख्येने विक्रीसाठी आणली जातात ही गुरे आणण्यासाठी व परत नेण्यासाठी लहानमोठ्या व अवजड वाहनांचा वापर केला जातो म्हणून येणाऱ्या वाहनांना उभे करण्यासाठी वरखेडी येथील उप बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्डात मोठे वाहनतळ उभारण्यात आले असून या वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते मात्र हे शुल्क वाचवण्यासाठी बरेचसे वाहन धारक आपली वाहने बाजार समितीच्या वाहनतळावर उभी न करता ही वाहने भररस्त्यात तसेच वरखेडी ते पाचोरा रस्त्यावर गुरांच्या बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भररस्त्यात उभी करतात.
तसेच याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी, दलाल व गुराढोरांचे मालक उभे रहात असल्याने पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होतो यामुळे प्रवासी बस, रुग्णवाहिका, शासकीय वाहनांना तसेच खाजगी वाहनांना तासंतास या ठिकाणी थांबावे लागते यामुळे येथे वादविवाद होतात म्हणून रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून ही वाहने बाजार समितीच्या वाहनतळावर उभी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व भररस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
कारण रुग्णवाहिकेतून रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी वेळ महत्वाची असते तसेच शासकीय नोकर, शालेय विद्यार्थी व दैनंदिन कामकाजासाठी बाहेर जाणारांची वेळ निघून गेल्यावर बरीचशी कामे खोळंबतात म्हणून ही वाहने त्वरित हटवण्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.