दिव्यांग सप्ताह निमित्त तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला मनमुराद आनंद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२२

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, शिक्षण विभाग भडगाव व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव तालुक्यात तालुकास्तरीय दिव्यांग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुकाभरातून १३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला.

संपूर्ण भारतात तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान अपंग सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सप्ताहाचे अवचित्य साधत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ. अनिल झोपे, भडगाव तालुका संपर्क प्रमुख प्रा. अरूण भांगरे, समग्र शिक्षा अभियानाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती सुषमा इंगळे यांच्या आदेशान्वये भडगाव शिक्षण विभाग प्रमुख गटशिक्षणाधिकारी श्री. सचिन परदेशी यांच्या नेतृत्वात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय स्पर्धा शहरातील आदर्श कन्या विद्यालयात आज संपन्न झाल्या.

दोन गटात झालेल्या या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये लहान गटात लिंबू चमचा, संगीत खुर्ची, खो—खो, चित्र रंगविणे तर मोठ्या गटात वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खो—खो आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे मयूर मा. श्री. विसपुते व हरीष नेरपगार यांनी विद्यार्थ्यांना बक्षिस आणी सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले.

या स्पर्धा यशस्वीतेसाठी आदर्श कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेश रोकडे, उप शिक्षक कैलास पवार, तसलीम खान, शेख रफिक, आमिर खान कुरेशी, वसीम खान, किशोर पुजारी, विषयतज्ञ मनोहर माळी, समग्र शिक्षा अभियान तालुका समन्वयक निंबा परदेशी, सुभाष माळी, विशेष शिक्षक जितेंद्र माने, किशोर पाटिल, छाया चौधरी, प्रतिभा पाटील, सविता चौधरी व मिलिंद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

ब्रेकिंग बातम्या