कृषी विभागाचा सिंगल फेज विद्युत पुरवठा रात्रीचे वेळी सुरू करावा. (जगदीश तेली यांची मागणी)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक व कुऱ्हाड खुर्द या गावातून कोरोना बाधितांची सख्या दिवसेंदिवस वाढत असून आजच्या परिस्थितीत ही दोघेही गावे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत असले तरी लोहारा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे अथक परिश्रम घेत असून पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब व तहसीलदार मा.श्री.कैलासजी चावडे तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी या गावांमध्ये भेटी देऊन परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच बऱ्यापैकी कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत येत आहेत.
परंतु कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावातील आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांची घरे लहान असल्याने ते आपल्या कुटूंबासोबत राहू शकत नसल्याने बऱ्यापैकी कोरोनाबाधीतांनी आपपल्या शेतात राहून उपचार घेत कोरोनाचा सामना करत आहेत.
मात्र शेती शिवारात आश्रयाला गेलेल्या कोरोनाबाधीतांना आसपास राखीव जंगल असल्याने जंगली श्वापदापसून बचाव करण्यासाठी रात्रभर जागुन काढावी लागते. यामागील मुख्य कारण म्हणजे शेत शिवारात कृषी विभागाचा विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने तसेच निळे रॉकेल मिळत नसल्याने रात्रभर केरकचरा पेटवून उजेडात राहाण्यासाठी प्रयत्न करावे लागत असल्याने कोरोना बाधितांना आरामदायी रहाता येत नसल्याने अजूनच अशक्तपणा येत आहे.
या समस्येची दखल घेत विद्यूत वितरण कंपनीने कोरोना बाधितांना शेत शिवारात उजेडात रहाण्यासाठी कृषी विभागाचा सिंगल फेज विद्यूतपुरवठा सुरु करुन सहकार्य करावे अशी मागणी भाजपाचे कुऱ्हाड, लोहारा गटाचे गणप्रमुख मा.श्री. जगदीश तेली यांनी मागणी केली आहे.