भोकरी (वरखेडी) येथून चोरीला गेलेल्या आयशर गाडीसह आरोपी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या जाळ्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या भोकरी येथील रहिवासी रशीद काकर यांच्या मालकीची आयशर एम. एच. १९ झेड २९२८ क्रमांकाची आयशर गाडी दिनांक २१ मार्च २०२३ मंगळवार रोजी रात्रीच्या वेळी चोरीला गेली होती. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५९/२०२३ भा. द. वि. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक मा. श्री. रमेशजी चोपडे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री. अभयसिंह देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मा श्री. महेंद्र वाघमारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. विजय माळी, पोलिस हवालदार श्री रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल श्री. गोकुळ सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल श्री. अभिजित निकम, पोलिस कॉन्स्टेबल श्री. संभाजी सरोदे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. दिपक पाटील या टीमने रात्रंदिवस मेहनत घेऊन भोकरी, वरखेडी गावापासून तपास करण्यात सुरुवात करुन रस्त्यावरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तसेच गुप्त खबऱ्यामार्फत माहिती घेत थेट अहमदाबाद पर्यंत शोध मोहीम राबवली होती. या तपासकार्यात आर. के. पाटील व जितेंद्र पाटील यांनी विशेष कामगिरी पार पाडली याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
या शोधमोहीमेत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना यश येऊन अहमदाबाद शहरातून भोकरी (वरखेडी) येथून रशीद काकर यांच्या मालकीच्या आयशर गाडीसह आरोपी खुर्शीद अहमद यास त्याने गुन्हा करणेकामी वापरलेल्या मोटार सायकल ताब्यात घेतले आहे.