बेगमपुरा पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला ३२ वर्षीय मनोरुग्ण महिलेला दिला न्याय, घाटि रुग्णालयात प्रथोमोपचार करुन वृध्दाश्रमात केले दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/११/२०२१
बोधी व सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे मदतकार्य
आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की आपला जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर ? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी,अथवा पत्नी,किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.
अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या जवळच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे. कारण त्या आजारी आहेत, मनोविकृत आहेत.औरंगाबाद शहरात पुडलीकनगर भागात प्रीया कीर्तीकर कीरायाने आपल्या १२ वर्षीय मुलासोबत राहत होती. हाताला येईल ते काम करुन आपला उदरनिर्वाह भागवीत होती. लॉकडाऊन पासुन काम बंद पडले, घराचे भाडे हि थकले, किराणा मालाची उधारीही थकली. परंतु तीला कोणाचाही सहारा न मिळाल्याने ती मनस्ताप करुन मनोरुग्ण स्थीतीत वेड्यासारखे वागत असल्याने, अपशब्द बडबडणे, स्वतःच्या मुलाला मारणे अश्या प्रकारे कृत्याने गेल्या तीन महिन्यापासून त्रस्त होती.
तीला घरमालकानेही रुममधून हाकलून दिले. त्या पुर्णपणे बेवारस अवस्थेत आपल्या मुलाला घेवुन फिरु लागली.तीची तब्येत जास्त झाल्याने नागरीकांनी मुलाच्या मदतीने घाटि रुग्णालयात रात्री दाखल केले असता,मानसोपचार तज्ज्ञांनी तीला प्रथोमोपचार केले.आपण बेसहारा असल्याची बाब तिच्या १२ वर्षीय मुलगा कृतांत याने समाजसेवा अधिक्षक नरेंद्र भालेराव घाटी यांना सांगितले.आईच्या अश्या अवस्थेत तिला कोठे नेऊ म्हणून मुलगा रडू लागला.भालेराव यांनी बेवारस निराधारांच्या मदतीला नेहमी धावून येणारे समाजसेवक सुमित पंडित यांना सदरील महिलेची माहिती दिल्यावर त्यांनी स्वतः घाटीत येऊन रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आणि धिर दिला. त्या मुलाने माहिती दिली की, त्याचे वडील भुसावळ येथे रेल्वे मध्ये नोकरी करतात.पण याचा जन्म होण्याच्या आधीच त्यांनी आईला बेवारस सोडून दिले आहे. आजी,आजोबा वारले आहेत आणि मामा सांभाळ करत नाहीत. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे या मुलाचे शिक्षण पण थांबले आहे. सुमित पंडित यांनी ही बाब बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांना सांगितली.श्री पोतदार यांनी यांनी या महिलेला मदत करू आणि तिचे पुनर्वसन करू म्हणून महिलेला पोलीस स्टेशनमध्ये सुमित सोबत बोलून घेतले. प्रशांत पोतदार यांनी मनोविकार तज्ञ आणि सुमित पंडित यांच्याशी चर्चा करून या महिलेची राहण्याची व्यवस्था बोरवाडी येथील उमा तुपे संचलित दैवत वृद्धाश्रम येथे करण्याचे ठरविले त्यासाठी माणुसकी टिम आणि पोलिसांनी काही रक्कम जमा करून खाजगी वाहनांनी या माय लेकांना बोरवाडी येथे पाठविण्याची व्यवस्था केली. आणि त्या मुलाच्या शिक्षणाची पण व्यवस्था करण्याचे आश्वासन सुमित यांनी दिले मुळ बोरवाडी येथे त्यांना हक्काचा निवारा मीळाल्याने कृतांत ने आनदाश्रु येत आभार मानले. या सामाजिक कार्यासाठी पोलीस निरिक्षक प्रशांत पोतदार बेगमपुरा, विक्रमसींग चव्हाण उपपोलीस निरिक्षक,शरद वाणी,भोज स्टेशन बेगमपुरा,नरेंद्र भालेराव घाटी,
माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित,जगन शिरसाठ भारतीय सैनीक,पालीवाल,आप्पासाहेब गायके,बाबा देशमुख परभणी,दिगंबर सोनटक्के,सागर पागोरे,योगेश थोरात,गजानन क्षिरसागर,डॉ रंजना प्रशांत दंदे,उमा तुपे,समाजसेविका पुजा पंडित,आदिंनी मदतकार्य केले.
———————————————————————
*आतापर्यंत आमच्या माणुसकी टिम ने कितीतरी मनोरुग्ण महिलेला न्याय दिला आहे*
माणुसकी समूह आता सामाजिक दायित्व साठी आणि सामाजिक कर्तव्य स्वीकारण्यासाठी एक समानार्थी शब्द बनलेला आहे. ती भगिनी मानसिक आजाराने पीडित आहेत.हा तीचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा? हे प्रश्न कायम समाजाला विचारल्या जात आहे,आणि कोणीही कायमस्वरूपी ह्यावर उत्तर द्यायला तयार नाही.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात. पण ज्या सामाजिक संस्था अशा मनोरुग्णांसाठी काम करतात त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उद्योजकांनी समाजबांधवांनी समोर येणे अत्यंत गरजेचे ठरते. या मदतीतून आपण या मनोरुग्णांचे जीवन अधिक सुसह्य करू शकतो. आणि समाजाची खरी मानसिक विकृती नष्ट होईल.
——सु लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थापन सुमित पंडित