४ जूनला कुसुम्ब्यात प्राकृत दिनानिमत्त ग्रंथदिंडी व पालखी सोहळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२२
चार जून शनिवार श्रुतपंचमी अर्थात प्राकृत दिनानिमत्त कुसूंब्यासह खान्देशात मोठ्या उत्साहाने हा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येत असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख आणि कुसुम्बा जैन क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली आहे.
चार जूनला सकाळी महामस्तकाभिषेक, प्राचीन ग्रंथाचे पूजन विधी व गावांतून ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रतिष्ठाचार्य प्रदीपकुमार शास्त्रीच्या मार्गदर्शनात प्रेरणेने तर त्यात विशेष पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवामंचचे सदस्यांनी सहभाग नोंदविल्यामुळे समाज बांधवात उत्साह संचारला आहे. जैन संप्रदायातील महान ग्रंथ धवला महाधवल षटखंडागम ग्रंथ हे प.पु.दिगम्बराचार्य श्री. १०८ धर सेनाचार्य यांचा मौखिक असलेला जैन धर्मातील महान ग्रंथ षटखंडागम ग्रंथ त्यांचे दोन तज्ञ शिष्य श्री. १०८ पुष्पदंतमुनी व श्री. १०८ भूतबलीमुनी यांच्या करवी हा ग्रंथ लिपीबद्ध करण्यात आलेला आहे.
त्यास सुमारे १९१२ वर्षाचा काळ लोटला आहे. तो दिवस म्हणजे जेष्ठशुद्ध पंचमी होय म्हणून त्यास “श्रुतपंचमी ” दिवस म्हणतात. तो ग्रंथ प्राकृत भाषेत असून त्या दिनापासून जैन बांधव प्राकृत दिवस साजरा करीत असतात जैन बांधव या दिवशी ग्रंथाची पूजा अर्चा करून पालखी काढतात संस्कृतीचा आधार असलेल्या शास्त्रग्रंथाचे संरक्षण संवर्धन व्हावे हा त्याचा खरा उद्देश आहे.