भू माफीयांचा गोरखधंदा, प्लॉट विकतांना फक्त खुणा टाकून अनेकांना लावला जातोय चुना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०९/२०२१
आजच्या परिस्थीतीत खेडेगावांसह शहरी भागातील गाव,खेड्यांचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण होत आहे. नेमके याच संधीचा फायदा घेत काही श्रीमंत लोकांनी या व्यवसायात उडी टाकून गावाजवळील शेतजमिनी अल्पदी विकत घेऊन त्या बिगरशेती करत म्हणजे (एन.ए.) करुन त्या जागेवर प्लॉट टाकून त्यांची विक्री सुरु करुन पैसा कमावण्याचा व्यवसाय (गोरखधंदा) सुरु केला आहे.
खरेतर शेतजमीन बिगरशेती करुन प्लॉट विकणे हा काही वर्षापूर्वी व्यवसाय होता परंतु या व्यवसायात आता लबाडी व फसवणूक केली जात असल्याने आजतरी या व्यवसायाला गोरखधंदा म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
परंतु सद्यस्थितीत खेडेगावात शेतजमिनी खरेदी खरेदी करुन प्लॉट विक्रीच्या व्यवसायाने वेग घेतला असून हा व्यवसाय करतांना फक्त आणि फक्त पैसा कमावण्याच्या नादात शासनाने ठरवून दिलेले नियम व अटी यांची कोणतीही तमा न बाळगता सर्व नियम धाब्यावर बसवून फक्त प्लॉटची आखणी करतांना फक्त चुना टाकून प्लॉट दाखवले जातात. मात्र हे करतांना प्लॉट धारकांची फसवणूक होत असल्याची म्हणजे चुना लावला जात असल्याची जोरदार चर्चा पाचोरा तालुक्यात सुरु आहे.
तसेच शेतजमीन बिगरशेती झाल्यावर स्थानिक ग्रामपंचायचा रितसर नाहरकत घेणे गरजेचे असल्यावरही परस्पर प्लॉटची खरेदी विक्री केली जात आहे. तसेच आखणी केल्यानंतर ठरलेल्या नियम व अटी प्रमाणे त्या परिसरात धार्मीक स्थळासाठी तसेच ओपनप्लेस करीत भुभाग सोडणे कायदेशीर असतांनाच असे कोणतेही नियम न पाळता धार्मिकस्थळ व सार्वजनिक म्हणजे (ओपनप्लेस) क्षेत्रातील जमीनीची सुध्दा विकुन त्याठिकाणी लॉटची आखणी करुन ते विकण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे नवीन प्लॉटची विक्री करण्याअगोदर त्या परिसराला तारेचे कुंपण करुन रस्ते, सांडपण्याच्या गटारी, विद्यूत पुरवठा, बगीचा त्या बगीच्यात मुलांसाठी खेळणी व इतर सुविधा पुरवणे गरजेचे असतांनाच असे कोणत्याही पुर्तता न करता प्लॉट विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी तर प्लॉट व्यवसाईकांनी कहरच केला असून या परिसरातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह म्हणजे पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून नेणारे नाले, वळण बुजवून टाकल्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी अडचणी निर्माण होऊन त्या पावसाच्या पाण्यामुळे गावपरिसरात मोठमोठे डबके तयार होऊन इतर गाववस्तीतील नागरिकांना नहाकच त्रास सहन करावा लागत आहे.
महत्त्वाचे~पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात एका इसमाने बाहेरगावी रहाणाऱ्या एका महिलेच्या शेतजमीनीवर अनाधिकृतपणे ताबा मिळवून खोटे दस्ताऐवज तयार करुन ती जमीन बिगरशेती करत एका विश्वासू मित्राच्या नावावर करुन परस्पर प्लॉट विक्री केल्याचे उघडकीस आले असून जवळपास ३८ प्लॉट खरेदी धारकांची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा सुरुआहे. विशेष म्हणजे हे प्लॉट विकत घेऊन प्लॉटधारकांनी आपल्या आयुष्यभरच्या कमाईतून घरे उभारली आहेत. व आपल्या भावी पिढीसाठी स्वप्न रंगवली आहेत. परंतु आता संबंधित मुळ मालक महिलेने न्यायालयातून रितस ताबा घेण्यासाठीची लढाई जिंकली असून संबंधित महिला लवकरच या जागेवर ताबा घेणार असल्याचे समजल्यावर व तश्या नोटीस संबधीतांना मिळाल्यापासून खरेदीदार प्लॉट धारकांची मानसिकता खराब झाली असून ते मानसिक तनावाखाली आले आहेत. म्हणून आया फसवणूक झालेले प्लॉट धारक लवकरच संबधीतावर गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.