आज जळगाव जिल्हयात ९९६ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ७ जणांचा मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२१
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट ७.३७ टक्के इतका
जळगाव जिल्ह्यात आज स्वॅब घेतलेल्या पैकी आज पुन्हा ९९६ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, कोणत्याही समारंभात गर्दी न करणे अशी अधिक खबरदारी घेणे आता गरजेचे झाले आहे.
आज जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर २१७ ,जळगाव, ग्रामीण ०३, भुसावळ ४२, अमळनेर ९१, चोपडा १८१ , पाचोरा ६५, भडगाव १९ , धरणगाव ७८,यावल ४० , एरंडोल ५५, जामनेर ६०, रावेर २१, पारोळा २८, चाळीसगाव ५९, मुक्ताईनगर २३, बोदवड ११ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकूण ९९६ रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात रूग्ण ५३२ बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६३५५९ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ८५५० ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ७३५७१ झालेली आहे. जिल्ह्यात आज ७ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १४६२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.