जागृती विद्यालयाची कु. अक्षरा बागुल जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०९/२०२३
पाचोरा येथील जागृती विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली कु. अक्षरा सुभाष बागुल हिने शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. जी. सावंत सर व क्रीडा शिक्षक श्री सुनील एल.पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत तीने नावलौकिक मिळविला आहे.
कु. अक्षरा बागुल हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिची विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल जागृती विद्यालयाचे मानद सचिव भैय्यासाहेब योगेश पाटील, संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.