वावडदा ते वडली. पाचोरा मार्गावरील वाहतुक ठप्प.
सुमित पाटील(वावडदा)
दिनांक~०२/१०/२०२१
शनिवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी सकाळी ४.१५ ते ७.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यामुळे वावडदा जवळील गलाठी नाल्याला मोठ्या प्रमाणात पुराचे आल्यामुळे जळगाव ते मनमाड मार्गावरील वाहतुक सकाळी ५ ते १२.३० वाजेपर्यंत बंद होती.
या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून जवळपास८० टक्के काम झालेले आहे. परंतु समंधीत ठेकेदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पंचक्रोशीतील गावातील नागरिक करत आहेत. कारण हे काम धीम्या गतीने होत असल्याने पंचक्रोशीतील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून हि समस्या वारंवार येत असून याच आठवड्यात दोन वेळा हा पाच ते सात तास वाहतूक खोळंबली होती. म्हणून अत्यावश्यक कामानिमित्त व दवाखान्यात जाणाऱ्या लोकांना खुपच मनस्ताप सहन करावा लागत आहे.