पुरहाणी पासून बचावासाठी पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गटारीच्या बांधकामासाठी रेती (वाळू) एवजी दगडाच्या कच चा वापर, चौकशीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०५/२०२२
अंबे वडगाव येथे पुरहाणी पासून बचावासाठी पन्नास हजार रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या गटारीच्या बांधकामासाठी रेती (वाळु) एवजी उघड, उघड दगडाचा कच (भुकटी) वापरुन बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम जामनेर, पाचोरा महामार्गावर दिवसाढवळ्या केले जात असून या बाधकामाकडे संबंधित अभियंता, अंबे वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व इतर लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने या गटारीच्या बाधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून ही गटार पहिल्याच पावसाळ्यात वाहून जाते की काय किंवा या गटारीच्या ढाप्यावरुन एखादे अवजड वाहन गेल्यानंतर गटारी वरचा ढापा तुटतो की काय अशी शंका सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात हे बांधकाम सुरु झाल्यापासून या बांधकामाच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याने तसेच हे काम ज्या इंजिनिअरच्या देखरेखीखाली होत आहे. त्या इंजिनिअर किंवा ठेकेदाराकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने व काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने गाव परिसरातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या बांधकामाच्या चौकशीसाठी लवकरच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येणार आहे.
(याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून सविस्तर वृत्त पुढील भागात)