दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२३

सद्यस्थितीत महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते यामागील मुख्य कारण म्हणजे दारु, स्वैराचार व विकृती कारणीभूत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशीच एक घटना संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली असून एका २४ वर्षीय तरुणाने आईच्या वयाच्या म्हणजे ८५ वर्षं वयाच्या वृध्द महिलेवर अत्याचार करत साडीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील भोजे येथुन जवळच असलेल्या चिंचपुरे येथील रहिवासी गुलाब आबा बेलदार वय वर्षे (२४) हा युवक संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे आपल्या बहिणीला भेटावयास गेला होता. हा बहिणीच्या घरी गेल्यावर बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या वृध्द महिलेवर पडली व दारुच्या नशेत असलेल्या गुलाब बेलदार याच्या मनातील वासनेचा सैतान जागा झाला गुलाब बेलदार हा संधीची वाट पाहत होतो. सोमवारी रात्री सगळे झोपल्यावर सगळीकडे शांतता पसरली होती. मात्र दारुच्या नशेत असलेल्या वासनांध गुलाबच्या मनातील सैतान जागा झाला होता.

रात्रीच्या शांततामय वातावरणाचा तसेच ८५ वर्षीय वयोवृद्ध महिला ही एकटीच रहात असल्याने संधी साधून गुलाब हा दारुच्या नशेत सकाळी दोन वाजेच्या सुमारास वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसला घरात वयोवृद्ध महिला एकटीच असल्याचा फायदा घेत गुलाब याने आईच्या वयाच्या असाह्य महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केल्यावर दोघांमध्ये झटापट झाली यात महिलेचे डोके भिंतीवर आदळले गेल्यावर तीच्या डोक्याला जबर मार लागला याच संधीचा फायदा घेत गुलाब याने बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर गुलाब येथेच थांबला नाही तर आपण केलेल्या पापाचे पितळ उघडे होऊ नये म्हणून वृध्द महिलेच्या साडीच्या पदराच्या साह्याने गळा आवळून खून केला.

एवढे भयानक कृत्य करुनही गुलाब सभ्यतेचा आवा आणून बहिणीकडे थांबला होता. मंगळवार सकाळ झाली नित्यनेमाने सगळे शेजारीपाजारी आपापल्या दैनंदिन कामत लागले होते परंतु आजी एकट्याच रहात असल्याने शेजारीपाजारी सकाळी, सकाळी आजीबाईची विचारपूस करत असत परंतु आज आजी घराबाहेर का दिसत नाही व घरातुन काहीच आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांनी आजीबाईच्या घरात जाऊन पाहिले असता धक्कादायक दृष्य समोर आले व सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली हा गोंधळ पाहून आपण केलेल्या पापाचे भांडे फुटु नये म्हणून गुलाबने मध्ये भाग घेत रात्री आजीच्या घरात चोर आले होते म्हणून मी येथे आलो मी येताच चोरांनी आजीबाईला व मला मारहाण करत चोर पळून गेल्याचे सांगितले.

या घटनेबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलीसांना कळवली पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले पोलीस आल्याचे पाहून गुलाब हतबल झाला होता. तरीही त्याने मोठ्या हिंमतीने पुढे येत रात्री घडलेल्या प्रसंगाची दंतकथा सांगत स्वताचे पाप झाकण्यासाठीचा प्रयत्न केला. मात्र गुलाबने सांगितला घटनाक्रम पटण्यासारखा नसल्याने पोलीसांची संशयाची सुई गुलाब कडे होती. म्हणून पोलिसांनी त्वरित गुलाबला ताब्यात घेऊन पोलीसी हिसक्का दाखवताच गुलाब पोपटासारखा बोलू लागला तदनंतर पोलीसांनी गुलाबला ताब्यात घेत रितसर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.