ऐकावे ते नवलच सहाकार क्षेत्राच्या निवडणूकीतही ओल्या पार्ट्या व पैशांचा पाऊस लाखो रुपयांची उलाढाल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४//०५/२०२२
जिसकी लाठी उसकी भैंस.
सद्यस्थितीत सगळीकडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका सुरु आहेत पैकी काहींच्या निवडणूका पार पडल्या असून निकाल लागले आहेत व अजून काही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका होत आहेत व काही होणे बाकी आहे. या निवडणुकीत कधी नव्हे एवढी रस्सीखेच खेच सुरु असुन या सहकार क्षेत्रातील निवडणुकीत आता थेट राज्य पातळीवरून लक्ष ठेवले जात आहे. तसेच जिल्हा व तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपली कंबर कसली असून आपलेच पॅनल यावे म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून निवडणुकीत सहभाग नोंदवला.
या अगोदर मागील काही वर्षापुर्वी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका गावपातळीवर फक्त आणि फक्त शेतकरी सहभागी होऊन लढवल्या जात होत्या व गावातल्या गावात निर्णय घेऊन जास्तीत जास्त सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या पैकी काही सोसायटीच्या निवडणुकीत समोरासमोर लढत होऊन खेळीमेळीच्या वातावरण पार पडत होत्या तसेच निवडणूक पार पडल्यानंतर भरीत, पुरी किंवा दाळ, बट्टीचे जेवण केले जायचे हे जेवन देतांना विजय पॅनल सह पराभूत झालेले पॅनलचे उमेदवार सुद्धा सहभोजनाचा आनंद घेत एकत्रितपणे आपसातील मतभेद विसरून जायचे व एकोपा कायमस्वरूपी रहात होता.
परंतु या वर्षाच्या पंचवार्षिक निवडणुकीत वेगळा अनुभव येत असून या गल्लीतल्या निवडणुकांमध्ये दिल्लीपासून हस्तक्षेप होत असल्याचे दिसत आहे. यामागील कारण ही तसेच आहे कारण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत जास्तीत जास्त सोसायटी ताब्यात आल्या म्हणजे जिल्हा बँकेचे निवडणूक लढवतांना मते आपल्या पदरात पाडून जिल्हा बँक ताब्यात घेणे सहज सोपे होते. तसेच या वर्षी भविष्य येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन ही पाया बांधणी करून आपापल्या पक्षाचे बळ वाढवण्यासाठी या निवडणुकांकडे जास्त लक्ष दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही निवडणूका ह्या लोकशाही मार्गाने झाल्या पाहीजे हे जरी खरे असले तरी आज मात्र सगळ्याच निवडणुकीत काम, दाम, दंड, भेद वापरुन असतील नसतील असे सगळे डावपेच व हातखंडे वापरुन आपण किंवा आपले पॅनल कसे निवडून येईल याकरिता खेळी खेळली जात आहे. असाच काहीसा प्रकार आता घेण्यात येत असलेल्या सहकार क्षेत्रातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत दिसून येते आहे.
या सहकार क्षेत्रातील निवडणुकीत यावर्षी कधी नव्हे इतकी चुरस व काट्याची लढत होत आहे. आजपर्यंत या निवडणुकीत तालुक्यातील किंवा जिल्हा पातळीवरचे लोकप्रतिनिधी फक्त सल्ला द्यायचे व निवडणूक खेळीमेळीच्या वातावरण होऊ द्या असे सुची करायचे मात्र यावर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुका व जिल्हास्तरावरील आजी, माजी लोकप्रतिनिधी (सल्या सोबतच गल्ला) ही देत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याच सल्ला व गल्ल्याच्या देवाणघेवाणीत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका कधी नव्हे इतक्या चुरशीच्या होत असून संबंधित पॅनलचे उमेदवार जास्तीत, जास्त मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जास्तीत, जास्त मतदान असे मिळेल यासाठी थकबाकी असलेल्या सोसायटीच्या सभासदांचे कर्ज भरुन त्यांना जेवणावळीचा खर्च करत असून काही ठिकाणी मतदारांना ओल्या पार्ट्या देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडून झाल्यानंतर तीर्थक्षेत्रावर किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी तुम्हाला सहलीला घेऊन जाऊ असे आश्वासन देऊन एका मतासाठी तीन हजार रुपया पासून तर पाच हजार रुपये रोकड पैसे मोजून देत आहेत.
हा प्रकार इथेच थांबला नसुन ज्यांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही किंवा ते कोणत्याही सोसायटीचे सभासद नाहीत परंतु त्यांचे राजकीय वजन आहे किंवा त्यांची गावात पत आहे अशा लोकांना भेटून त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये कबूल करून तुम्ही आमच्यासाठी आमच्या प्रचार करा व जास्तीत जास्त मते आम्हाला मिळवून द्या यासाठी प्रयत्न करत असून काही उमेदवारांनी दलाल नेमले आहेत.
या घाणेरड्या राजकीय खेळीमुळे निष्ठावंत स्वच्छ चारित्र्याचे व संस्थेचे भले करू पाहणारे सभासद इच्छा असल्यावरही या निवडणुकीपासून चार हात लांब राहत आहेत. या प्रकारामुळे गावागावात दुफळी निर्माण होत असल्याची खंत शांत व सुस्वभावी लोकांनी गावागावातून व्यक्त केली असून या निवडणुकीत आजपर्यंत बऱ्याचशा सोसायटीच्या निवडणुकीत मतदानाचा अगोदर व निकाल लागल्यानंतर भांडणतंटे झाले आहेत. याबाबत बरीचशी भाडणे पोलीस स्टेशन पर्यंत गेली आहे.
(सगळ्याच निवडणुकीत हा प्रकार घातक असून लोकशाहीसाठी भविष्य मोठ्या धोक्याची सूचना आहे.)
बातमी योग्य असल्यास लाईक नक्कीच करा.