डॉक्टर असुरक्षित
डॉक्टरांनो,याला जबाबदार कोण?
खंडणीखोरांचा हैदोष!
डॉक्टर असुरक्षित!!
डॉक्टरांनो,ही परिस्थिती खूप वाईट आहे. आणि जो प्राण वाचवतो,त्याच्यावर ही वेळ आली.हे जास्त वाईट !
सरकारने डॉक्टरांना संरक्षण दिले पाहिजे .हेच खरे.फक्त कायदे करून हे थांबणार नाही तर यावर प्रतिबंधक उपाय केला पाहिजे .
सरकार कडे संरक्षणाची मागणी केली. शस्राची परवानगी ही मागितली. ती मिळेल तेंव्हा मिळेल.पण त्यासोबतच आपण काही पावले उचलली पाहिजे.
असे जे खंडणीबहाद्दर आहेत ते कोणातरी राजकीय गुंडांच्या आश्रयाला असतात. भुसावळ, धुळे आणि आता जळगावात सुद्धा याचा अनुभव येत आहे.भुसावळ ला चौधरी आमदार असताना आणि सावकारे आमदार असतांना हा फरक ठळकपणे जाणवतो.
आम्ही डॉक्टर,इंजिनिअर, वकील,प्रोफेसर ,साहित्यिक मंडळी बुद्धिमान असतो.उच्चशिक्षित असतो.पण समाजातील राजकीय गुन्हेगारीबाबत उदासीन असतो.जळगाव मधील निवडणूक काळात मी याचा बारकाईने अभ्यास केला.ही मंडळी खूप उदासिन दिसली.यांचा गु़ंड आणि गुन्हेगार विरोध कुठेही आढळला नाही. आणि प्रामाणिक उमेदवारांना कुठेही सहकार्य जाणवले नाही.
मी व्यक्तीशः अनेक डॉक्टर,इंजिनिअर, प्रोफेसर, वकील इतकेच नव्हे कुलगुरूला सुद्धा भेटलो.पण मी भले,माझी नोकरी भली, माझा धंदा भला,या मानसिकतेत आढळले.
तुम्ही चालू द्या.आमचा आशिर्वाद आहे.असे म्हणून पाठ फिरवली.
म्हणून तर जळगाव महानगरपालिकेत अनेक नामचीन गु़ंड निवडून आलेत.एका डॉक्टर, वकील, प्रोफेसर, इंजिनिअर ची मजाल नाही कि नगरसेवकाच्या डोळ्याला डोळा भिडवून जाईल. मनपाची पायरी सुद्धा चढण्याची हिंमत नाही.
आम्ही सार्वजनिक काम करताना आमच्या कडे शस्त्र नाही, सरकार चे संरक्षण नाही तरीही आम्ही मैदानात उतरतो.गुंड,गुन्हेगार,भ्रष्टाचार विरोधात लढतो.तेंव्हा उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, वकील आम्हाला पाहून दुरून निघून जातात.हे खचलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
जळगाव कोर्टाच्या भींतीलगत ,मोराको हॉटेल समोरच्या गल्लीत एक गटार फुटून सर्वत्र दुर्गंधी येत होती.आम्ही पोलीस,वकील आणि न्यायाधीशांच्या नजरेतील आरोपींनी त्या गटारीचे चित्रण केले.अनेक वकील आम्हाला पाहून दुरून निघून गेले. समोरच एका वकीलाचे घर आहे.त्यांनी तर घरातून बाहेर येऊन आमच्या कडे पाहिले. आणि आंत जाऊन फाटक आणि दरवाजा बंद करून घेतला.काय भीती वाटली असेल? तुम्ही तर कायदेतज्ज्ञ असतात. अन्याय निवारण करून न्याय मिळवून देतात.मग येथे कोणता न्याय लागू केला असेल?कोर्टाच्या आत आवारात अनेक वकील,न्यायाधीश होते.आम्हाला पाहिले. आणि मान वळवली.जसे आम्ही या समाजाचे कोणीही नाहीत.या रस्त्यावर ,या गल्लीत कितीही घाण असली तरी आम्हाला काय त्याचे?
मी पुस्तके वाचली,मास्तरने शिकवले म्हणून अपेक्षा होती,कि उच्चशिक्षित लोक देशाचे,समाजाचे आधारस्तंभ असतात.पण प्रत्यक्षात अनुभवले ते उलटेच.उच्चशिक्षित लोक समाजाचे,देशाचे आधार ही नसतात आणि स्तंभ ही नसतात.
मग ,या मंडळींनी समाजाकडून, देशाकडून चांगली अपेक्षा कशी करावी?
जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ,वैद्यकीय महाविद्यालय मधे कोरोना काळात खूप भ्रष्टाचार माजला. अनागोंदी माजली.त्यात एक म्हातारी शौचालय मधे मरून पडली.दहा दिवसात सडून वास मारू लागली.या घटनेचा राग येऊन काही डॉक्टर व मेडिकल स्टॉफला निलंबित केले.मी अशा डॉक्टरांना भेटलो.जे झाले ते झाले .आता खरे काय ते तरी जाहिरपणे सांगा. पण एकानेही हिंमत दाखवली नाही. फक्त स्वताचे रडगाणे गाईले आणि दुसऱ्या कडे बोट दाखवले.
आम्ही तीन चार माणसे यातील गौडबंगाल उघडकीस आणू ईच्छित होतो.पण एकाही डॉक्टर ने हिंमत दाखवली नाही. का? हे जळगाव त्यांचे नव्हते का? ही माणसे त्यांची नव्हती का? हा देश त्यांचा नव्हता का?या परिस्थिती ला ते जबाबदार नाहीत का?
.. .शिवराम पाटील.
9270963122.
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.