काळ आला होता पण वेळ आली नव्हती, पोलीस कॉन्स्टेबल श्री. राहुल बेहेरे व श्री. विश्वास देशमुख ठरले देवदूत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२२

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ याचा अर्थ चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे असा होय. पोलीस खात्याच्या या ब्रीदवाक्याचा एक वेगळाच सकारात्मक अर्थ पाचोरा पोलीस स्टेशनला असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. राहुल बेहेरे व मा. श्री. विश्वास देशमुख यांनी एका आईची आर्त हाक ऐकून निराशाजनक परिस्थितीत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा जीव वाचवून आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरात दिवाळीच्या सणानिमित्त सगळीकडे धामधूम सुरु असतांनाच घाबरलेल्या अवस्थेत एक महिला पाचोरा पोलीस स्टेशनला येते व पोलीस स्टेशनला आल्यावर सांगते की माझ्या मुलाने मी आत्महत्या करत आहे असा संदेश मोबाईलवर टाकला आहे व आता तो घरी व शोधल्यावर सापडला नाही साहेब तुम्हीच काहीतरी करा व माझ्या मुलाला वाचवा अशी विनवणी करु लागली. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. राहुल बेहेरे व मा. श्री. विश्वास देशमुख यांनी त्यांच्या गुप्त खबऱ्यांच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या व मित्रमंडळींच्या मोबाईल सविस्तर माहिती टाकून कुणालाही सदरची व्यक्ती आढळल्यास त्याला थांबवून ठेवा व आम्हाला कळवा असा संदेश पाठवला व तश्या सुचना केल्या.

पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेरे यांनी संदेश टाकल्यावर काही क्षणातच बिल्धी धरणाच्या पुलाजवळ एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती त्यांच्या खबऱ्या कडून प्राप्त होते. राहुल बेहेरे हे त्या व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्या संबंधित खबऱ्याला सांगतात व लगेचच विश्वास देशमुख यांना घेऊन बिल्धी धरणाच्या पुलाकडे धाव घेतात हे दोघ काही अंतरावर असतांनाच वैफल्यग्रस्त मानसिक तणावाखाली असलेली व्यक्ती नकळत जीव देण्यासाठी बिल्धी पुलावरुन पाण्यात उडी मारते त्याच ठिकाणी राहुल बेहेरे यांच्या सांगण्यावरून तेथे लक्ष ठेवण्यासाठी हजर असलेले सुकलाल भिल, बापु प्रल्हाद सोनवणे व पप्पू भाऊ सिंग मोरे यांनी जीवाची पर्वा न करता त्याच्या मागोमाग पाण्यात उडी मारुन त्याला पाण्यातून बाहेर काढले तोपर्यंत पोलिस कॉन्स्टेबल राहुल बेहेरे व विश्वास देशमुख घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या पाण्यातून बाहेर काढून काढलेल्या व्यक्तीला पाचोरा येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व योग्य ते उपचार करुन आईच्या स्वाधीन केले. पाचोरा पोलीस, सुकलाल भिल, बापु प्रल्हाद सोनवणे व पप्पू भाऊ सिंग मोरे यांच्यामुळे माझा मुलगा मला सुखरुप परत मिळाला म्हणून आईने सगळ्यांचे आभार मानले त्याक्षणी आई ढसाढसा रडत होती परंतु ते अश्रू आनंदाश्रू होते.

(आजतक हमने देखे है लाखो चेहरे, लेकीन सबसे अलग है राहुल बेहेरे.)

पाचोरा पोलीस स्टेशनला मागील पाच वर्षांपासून कार्यरत असलेले मा. श्री. राहुल बेहेरे यांनी जनमानसातून वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पोलीस म्हटल्यावर जवळीक निर्माण करण्यासाठी सहसा बरेच दचकतात परंतु राहुल बेहेरे यांनी एकाबाजूला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असतांनाच दुसरीकडे आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो अशी भावना उराशी बाळगून जनमानसात मिसळून आपले काम इमानेइतबारे करतांना माणूसकी जपत कुठलाही वादविवाद असो तो सामंजस्य ठेवून मिटवण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखाची जाणीव ठेवून त्यात सहभागी होऊन शक्य होईल तेवढी मदत व मार्गदर्शन करतात. सगळ्यांना समानतेची वागणूक देऊन भल्याभल्यांना आपलेसे करुन आपुलकी निर्माण केली आहे. सज्जनांचा मित्र तर दुर्जनांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत भल्याभल्यांना वठणीवर आणले आहे. असे सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे राहुल बेहेरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शेकडो तरुण स्वयंस्फूर्तीने रक्तदान करुन त्यांचा वाढदिवस साजरा करतात यावरुनच राहुल बेहेरे यांनी जनमानसातून तयार केलेली आपली इमेज लक्षात येते.

ब्रेकिंग बातम्या