वेळीच काळजी घ्या, आज जिल्ह्यात आढळले ३९ कोरोनाबाधित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२२
जळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजची आकडेवारी पुढील प्रमाणे असून जळगाव शहर – १७, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०९, अमळनेर-०१, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-०४, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ९०६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९१ रुग्ण सध्या उपचार घेताय.
(कोरोनाचा सामना करण्यासाठी सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे असून, जनतेने फक्त आणि फक्त शासनाच्या आधीन न रहात गावागावातील तरुण मंडळ, ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शासनाने जाहीर केलेल्या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करणे व ते आमलात आणण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.*सत्यजीत न्यूज पाचोरा*)