निषेधाची बातमी येताच ग्रामपंच कर्मचाऱ्यांनी केली गटारीची दुरुस्ती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी भुमिगत गटारी बनवण्यात आल्या असून मागील एक महिन्यापासून श्रीमती चिंधिबाई मराठे यांच्या घरासमोर व दिलीप जैन यांच्या घराजवळ सांडपाण्याच्या गटारीचा पाईप फुटल्याने याठिकाणी सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले होते तसेच डासांचा उपद्रव वाढला होता.
याबाबत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या कडे सांडपाण्याच्या गटारीचा पाईप दुरुस्ती करण्यासाठी वारंवार सांगूनही गटारींची दुरुस्ती केली जात नव्हती. म्हणून श्रीमती चिंधिबाई मराठे व दिलीप जैन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते व दुर्गंधी व डासांचा त्रास होत असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थिती झाला होता.
याबाबत सतत एक महिन्यापासून वारंवार सांगूनही ग्रामपंचायतीने सांडपाण्याच्या गटारीचा पाईप दुरुस्तीसाठी कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या तसेच वारंवार सांगूनही सरपंच व ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत होते म्हणून याचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच ०९ मे रविवारी दिलीप जैन. यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सांडपाण्याच्या डबक्यात गप्पी मासे सोडून ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवणार असल्याचे जाहीर केले होते.
शेवटी ग्रामपंचायतीचे कारकून श्री.सुनील निकम यांनी स्वता लक्ष देऊन एक मजूर लाऊन या सांडपाण्याच्या गटारीच्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करून दिल्यामुळे या चिखलच्या डबक्यात गप्पी मासे सोडून ग्रामपंचायतीचा निषेध करणे रद्द करण्यात आले असून दिलीप जैन यांनी सुनील निकम यांचे आभार मानले आहे.