एस.टी.कर्मचाऱ्याचा संप सुरूच, वाहक,चालक बिकट परिस्थिती. वाहकांवर शेंगदाणे फुटाणे विक्रीची वेळ.
ललित जैन.(चोपडा)
दिनांक~१८/१२/२०२१
(कर्मचारी वर्ग विकत आहेत, चणा जोरगरम, शासनाला नाही शरम अश्या घोषणा देत वाहक, चालकांचे आंदोलन सुरुच.)
एस.टी.महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी चोपडा आगाराचे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. अनेक दिवस उलटून देखील काही निर्णय घेत नाहीत. तर राज्य शासन जनतेची व कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. पगारवाढ कोणती आणि कशी केली ? याचे स्पष्टीकरण दयावे, एस.टी. चे विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही ह्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू असे कर्मचाऱ्यांनी एकजुटीच्या घोषणा देत सांगितले.
त्याच पद्धतीने राज्य शासनाने अनेक कर्मचाऱ्यांना शो- कॉज नोटीस बाजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे, परंतु आम्ही कर्मचाऱ्यामध्ये एकजूट असून आम्ही फूट पडु देणार नाही व शासनाच्या मनमानीला भिक घालणार नाही असेही कर्मचाऱ्यांनी घोषणा देत सांगितले.
आंदोलनाचा तोडगा निघाला नाही तर अनेकांचे जीव जातील एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये राज्य शासनाने वेगवेगळ्या पध्दतीने फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही संपाचा तिढा मिटत नाही. त्यामुळे राज्य शासनाने पगार वाढीचे आमिष दाखविले असले तरी ही एस.टी. कर्मचारी आपल्या विलीनीकरणच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य शासनाने पगार वाढ करून देखील एस.टी.ची चाके फिरत नसल्याने अनेकांचा संसार उघड्यावर येतांना दिसत आहे.
टेन्शन मध्ये तर अनेक वाहक चालकाचा जीव धोक्यात दिसत आहे.
वाहक- चालक कामाच्या शोधात आंदोलन करत संसाराचे गाढे कसे हाकायचे ? या विवेचनात असतांनाच अनेकांना अनेक आजाराला सामोरे जावे लागत आहे. तर अनेक वाहक – चालक वेगवेगळ्या कामाच्या शोधात दिसत आहेत. कोणी शेतात तर कोणी गावाकडच्या यात्रेत काहीतरी विकून पोट भरत आहेत. चोपडा आगारातील वाहक वेळोदे येथील खंडेराव महाराजच्या यात्रेत शेंगदाणे – फुटाणे विकुन आपली उपजीविका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संप असाच सुरु राहिला तर वाहक, चालकांची कुटुंब रस्त्यावर येतील त्यांच्या भावि पिढीला शिक्षण, आरोग्य व इतर सुविधा मिळणार नाहीत. म्हणून सामूहिक आत्महत्या घडतील अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे.