सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीला, एक तरुणाकडून भ्रमणध्वनीद्वारे जीवे मारण्याची धमकी.

बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीला, एक तरुणाकडून भ्रमणध्वनीद्वारे जीवे मारण्याची धमकी.

By Satyajeet News
March 17, 2022
735
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२२

पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील सासर असलेली एक २८ वर्षीय विवाहित महिला दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुकवार पासून पाचोरा तालुक्यातील लोहटार येथून बेपत्ता झाली असल्याची खबर महिलेचे वडील दिलीप मोहन परदेशी यांनी दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिली असून या खबरीवरुन संबंधित महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. एका बाजूला महिला बेपत्ता होऊन एक महिना उलटला तरीही महिलेचा शोध लागत नसून बेपत्ता झालेल्या महिलेचे पती व सासरे यांना एक अज्ञात भ्रमणध्वनीवरुन सतत फोन येत असून संबंधित इसम फोनवरुन सासरच्या मंडळींना धमकावत असल्याने हे कुटुंब हवालदिल झाले असून दहशतीखाली आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की लोहटार येथील दिलीप मोहन परदेशी यांची मुलगी खुशी उर्फ (सुवर्णा) हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील रवींद्र बुधेसिंग परदेशी याच्या सोबत समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे झालेला आहे. खुशी व रवींद्र यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर वंश व हर्षल या मुलांच्या रुपाने दोन चिमुकली फुले फुलली आहेत. रवींद्र हा मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे. यातच सौ. खुशी हिला काही दिवस लोहटार येथे माहेरी जायचे होते म्हणून एस.टी. सेवा बंद असल्याकारणाने खुशीचा पती रवींद्र याने स्वताच्या दुचाकीवरून खुशीला दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी लोहटार येथे पोहचते करून रवींद्र डांभुर्णी येथे आपल्या घरी परतला होता.

परंतु दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुक्रवारी सासरवाडीहून फोन आला व खुशी डांभुर्णी येथे आली आहे का ? अशी विचारणा करण्यात आली होती. परंतु खुशी लोहटार येथून बेपत्ता झाली व ती सासरवाडीलाही नसल्याचे माहीत झाल्यावर माहेरच्या व सासरच्या लोकांनी खुशीचा शोध घेण्यासाठी गावोगावी जाऊन व नातलगांना फोन करुन तपास केला मात्र खुशीचा तपास लागत नसल्याने दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी खुशीचे वडील दिलीप मोहन परदेशी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला खुशी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

सौ. खुशी ही मागील एक महिन्यापासून लोहटार येथून बेपत्ता झाली असून पोलिस तीचा शोध घेत आहेत. परंतु अद्यापही थांगपत्ता लागल नसल्याने सौ. खुशीच्या माहेरची व सासरची मंडळी हवालदिल झाली असून सौ. आपल्याला परीने सौ. खुशीचा शोध घेत आहेत. परंतु एका बाजूला खुशी हरवल्यापासून तिची शोधाशोध सुरु असतांनाच दुसरीकडे मात्र सौ. खुशीच्या पतीला व सासरच्या मंडळीला एका भ्रमणध्वनीवरुन धमक्या येत असल्याने डांभुर्णी येथील रवींद्र बुधेसिंग परदेशी याचे कुटुंब हवालदिल झाले असून दहशतीखाली जगत आहे. तसेच रवींद्र बुधेसिंग परदेशी हे फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात लवकरच पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे सौ. खुशीचे सासरे बुधेसिंग परदेशी यांनी सांगितले आहे. तसेच फोटोतील संबंधित महिला कुठेही आढळून आल्यास पाचोरा पोलिस स्टेशन किंवा ७८२३०३५०८० या क्रमांकावर कळवावे असे अवाहन मुलीच्या वडीलांनी केलेले आहे.

परंतु सदरील महिला मागील एक महिन्यापासून बेपत्ता झाली असून तिचे माहेरची, सासरची मंडळी व पोलिस तिचा तपास घेत आहेत. परंतु याच कालावधीत सदरील महिलेचे पती रविंद्र बुधेसिंग परदेशी यांच्या ९३५९१२३५८९ या भ्रमणध्वनीवर दिनांक ०८ मार्च २०२२ मंगळवार रोजी ९८३४४८६४५५ या भ्रमणध्वनी क्रमांवरुन दुपारी एक वाजेच्या सुमारास फोन आला व फोन करणाऱ्या व्यक्तीने मला शिवीगाळ व दमदाटी करत तु जर माझ्या विरोधात तक्रार केली तर मी तुला मारून टाकीन अशी धमकी दिली आहे.

अश्या आशयाची तक्रार पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दिनांक १४ मार्च २०२२ सोमवार रोजी तक्रार दाखल केली असून या घटनेचा साक्षीदार म्हणून समाधान शामलाल परदेशी या व्यक्तीचा पुरावा देत संबंधित धमकी देणारा भ्रमणध्वनी धारका मोहन भगवान परदेशी रहाणार डांभुर्णी याचे विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला प.ना.का.रजिस्टर नंबर १७३/२०२२ भा.द.वी. कलम ५०७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच माझी हरवलेली पत्नी सौ. खुशी उर्फ सुवर्णा ही धमकी देणाऱ्या इसमा सोबत असावी असा संशय व्यक्त केला असून भ्रमणध्वनीचा तपास करून संबंधिताला त्वरित अटक करावी अशी मागणी अर्जदार रवींद्र बुद्धसिंग परदेशी यांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कु.डॉ. वैष्णवी महाजन यांनी गणित विषयात पि.एच.डी ...

Next Article

कुऱ्हाड खुर्द येथे अवैधधंदे करणारांचे रक्तरंजीत धुलीवंदन. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    तारखेडा येथे बंद घरातून रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी.

    October 26, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वानेगाव येथील ३१ वर्षीय युवकावर पोस्को दाखल, आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.

    December 15, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    रेशनिंगचा तांदूळ पकडला यावल तालुक्यात मात्र घबराट होतेय पाचोरा तालुक्यात. सखोल चौकशी व थेट कारवाईची मागणी.

    October 30, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वऱ्हाड निघाल पाचोरा पोलीस स्टेशनला, चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. श्री. अभयसिंह देशमुख यांची सट्टा पेढीवर कारवाई.

    April 13, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    खेडीढोक येथील सरपंचावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल. खेडीढोक येथील रहिवाशी धनसिंग पाटील यांना केले होते आत्महत्येस ...

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पत्नीच्या नावाने बनावट स्वाक्षर्‍या करीत रक्कम काढणार्‍या पतीविरोधात गुन्हा दाखल.

    December 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    डेंग्यूची लागण झालेल्या पाचोरा शहरातील २२ वर्षीय तरुणीवर काळाचा घाला, नगरपरिषदेच्या कारभारा बाबत नागरिक संतप्त.

  • महाराष्ट्र

    पाचोरा एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू, राज्य शासनात विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.

  • प्रासंगिक

    सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी होतकरु तरुणांसाठी उघडले ज्ञानाचे भांडार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज