दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२३

जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंदुर्णी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या मोराड येथील तांडा वस्तीत एक इसम जुगाराचा अड्डा चालवत असल्याची गुप्त माहिती पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांना मिळाली होती. हा जुगाराचा अड्डा भरवस्तीत रात्रंदिवस सुरु रहात असल्याने याठिकाणी जुगारी याठिकाणी धिंगाणा घालत होते. तसेच रात्रीच्या वेळी भरवस्तीतच लघुशंका करत असल्याने जवळपासच्या घरातील महिला, मुलींना त्रासदायक ठरत होते.

याची दखल घेत पहुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांच्या कानावर आली होती. व हा जुगार अड्डा त्वरित बंद करण्यासाठी गळ घातली होती. याचीच दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी काल दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ गुरुवार रोजी पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पाटील व सहकाऱ्यांना मोराड येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पाठवले होते. पोलीस मोराड गावत आल्याची चाहूल लागताच पोलीसांना पाहून जुगारी फरार झाले होते.

मात्र काल पोलीस मोराड येथे गेल्यापासून जुगाराचा अड्डा बंद झाला असल्याने मोराड गावातील महिला व पुरुषांनी समाधान व्यक्त केले असून पहुर व शेंदुर्णी पोलीसांचे आभार मानले आहेत. व हा जुगार अड्डा कायमस्वरूपी बंद कसा ठेवता येईल याकरिता योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.