सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorizedक्राईम जगत
Home›कृषी विषयक›Uncategorized›जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु त्यालाच आम्ही मतदान करु. कुऱ्हाड येथील महिलांचा जाहीर फतवा.

जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु त्यालाच आम्ही मतदान करु. कुऱ्हाड येथील महिलांचा जाहीर फतवा.

By Satyajeet News
January 7, 2021
706
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२१
पाचोरा तालुक्यात९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका निश्चित झाल्या असून येत्या पंधरा जानेवारी शुक्रवाररोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरु असून आपलेच उमेदवार कसे निवडून येतीलकरीता सगळ्यांनीच कंबर कसली आहे.
यातच पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूक प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे.
यात कुऱ्हाड खुर्द या गावात नम्रता पॅनल व ग्रामविकास पॅनल मध्ये समोरासमोर सरळ लढत असून दोघांनी मते मिळवण्यासाठी सर्वप्रकारच्या क्लुप्त्या वापरणे सुरु केले असले तरी गावातील महिलांनी या निवडणुकीत मतदान करतांना सावध पावित्रा घेत
जो उमेदवार कुऱ्हाड गावातील सट्टा, पत्ता, दारु हे अवैधधंदे बद करतील त्यांनाच आम्ही मतदान करु असे कुऱ्हाड येथील महिलांनी सत्यजीत न्यूज जवळ बोलून दाखवले.
कारण कुऱ्हाड खुर्द गावात बसस्थानक परिसर, भरवस्तीत, हमरस्त्यावर तसेच धार्मिक स्थळांजवळ सट्टा बेटिंग व देशी व गावठीदारुची दिवसाढवळ्या खुलेआम विक्री रात्रंदिवस सुरु असते. विशेष म्हणजे कुऱ्हाड येथून जवळपासच्या दहा गावांना गावठी दारुचा पुरवठा होतो. तसेच गावापासून जवळच एका शेतात कुऱ्हाड येथील रहिवासी परंतु कामानिमित्त आमदाबाद येथे रहात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत जुगाराचा अड्डा सुरु आहे. या कारणांमुळे गावातील अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व जेष्ठ नागरिक सट्टा, पत्ता, दारुच्या आहारी गेल्याने बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादिच्या मार्गावर आहेत. तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच व्यसनाधीनतेत लहान मुले व तरुणांचा जास्त समावेश असल्याने हा प्रकार चिंताजनक आहे. तसेच व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपुर्तीसाठी संसारपयोगी वस्तू, दागदागिने विकून तर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून हा पैसा व्यसनात उडवतात व यामुळे घराघरात भांडणतंटे होऊन महिलांचा छळ होत आहे. म्हणून
मागील पाच वर्षापासून सुज्ञ नागरिक व महिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनपासून डी.वाय.एस.पी, डी.एपी, डी.आय.जी, आमदार खासदार यांच्यापर्यंत तक्रारी करुनही काही एक फायदा होत नाही.
कारण या अवैधधंदे करणारांना राजाश्रय मीळतो असा आरोप करत पोलीस तसेच जबाबदार अधिकारी हप्ते घेतात असा आरोप महिलांनी केला असून येत्या पंधरा जानेवारी पर्यंत हे अवैध बंद न झाल्यास आम्ही नकारात्मक मतदान करणार आहोत व याचे परिणाम निवडणूकीत दिसून येतील असे सांगून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
आता बघूया कोण काय निर्णय घेते किंवा कायद्याचे रक्षक काय भूमिका घेतात या आशेवर त्रस्त महिला जीवन जगत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 52
Previous Article

कुऱ्हाड येथील डॉ. महाजन यांच्या गोठ्यातील दहा ...

Next Article

सत्यजीत न्यूजला बातमी येताच कुऱ्हाड येथील बसस्थानक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते ऋषीपांथा गिरणा व मोती नदी संगमावर काशी पितांबर बाबा यांच्या मंदिरावर होम पूजन कार्यक्रम संपन्न…

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedराष्ट्रीय

    पाचोऱ्यात शिवसेना व काँग्रेसतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलन.

    December 4, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    महानोर बाई गेल्या अन.. कवितेचा मळा पोरका झाला.

    September 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील बरेच नाथाभाऊ प्रेमी राष्ट्रवादीच्या वाटेवर परंतु पहेले तुम पहेले तुम

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या सुचवा.

    January 22, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड खुर्द येथील गावठी हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची कारवाई.

    August 12, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    पाचोरा व भडगाव येथे आजपासून भरडधान्य खरेदीचा सुरुवात.

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी येथील स्व.‌ सरोजिनी पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्तृत्ववान महिलांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शेतकी संघात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते शुभारंभ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज