पिंपळगाव हरेश्र्वर येथे १९ फेब्रुवारी रविवार रोजी मोसंबी पिकावर चर्चासत्र.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे, शिंदाड, कोल्हे, पिंपरी, अटलगव्हान, माळेगाव पिंप्री व आसपासच्या गावातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात मोसंबी या फळबाग पीकाची लागवड करतात व चांगल्याप्रकारे उत्पन्न घेतात. परंतु हे उत्पन्न घेत असतांनाच सद्यस्थितीत निसर्गाचा होणारा बदल व यामुळे मोसंबी पिकावर नवनवीन रोगांचा होणारा प्रादुर्भाव व यापासून मोसंबी पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ आर्थिक खर्च व पिक हाती आल्यावर उत्पादनात होणारी घट तसेच बाजारपेठ मिळणारा भाव याचे गणित जुळत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत भरडला जात आहे.

ही बाब लक्षात घेऊन मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे लक्षात घेऊन पिंपळगाव हरेश्वर येथील हरेश्र्वर वाचनालय व पाचोरा कृषी विभागाचे संयुक्त विद्यमाने दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील हरेश्र्वर वाचनालयात सकाळी ठीक १० वाजता मोसंबी पीक घेतांना लागवडीपासून तर काढणीपर्यंत घ्यायची काळजी व येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी माहितीपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात पाचोरा कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील. यांची उपस्थिती लाभणार असून हे मोसंबी पिकावर अभ्यासपूर्ण माहिती देत मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून या चर्चासत्रात जास्तीत, जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन हरेश्र्वर वाचनालयाचे अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या