सातगाव डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२२
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात व सर्वदूर राजरोसपणे दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे सातगाव – गव्हले रस्त्यावर बेहड्याचे मोठं मोठे जुने हिरवीगार झाडे तोडून ट्रेक्टर उभे आढळून आले. याबद्दल विचारणा केली असता ट्रक्टर चालक व सोबतच्या इसमांनी उर्मटपणा करत अरेरावी केली म्हणून याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे साहेबांना प्रथम घटनेची माहिती देऊन वन अधिकारी मुलानी साहेबांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला असून मुद्देमालासह ट्रक्टर रीतसर जमा करण्यात आले आहे.
ह्या अवैधरित्या होत असलेल्या व तोंडी मागे रथीमहारथींचा पाठिंबा असल्याने वृक्षतोड सुरू असून वृक्षतोड करणाऱे व्यापारी आडदांड वृत्तीने वागून वृक्षतोडीस विरोध करणाऱ्यांना दमदाटी करत असल्याचे प्रकार घडत आहे असे मत दिपक परदेशी वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका महासचिव यांनी व्यक्त केले आहे.