अवैध धंदे बंद न झाल्यास कुऱ्हाड खुर्द च्या ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. भाग १
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२७/०४/२०२२
(कुऱ्हाड गावातील अवैध धंद्यात, गुमनाम हैं कोई, बदनाम है कोई भाग. २) सडेतोड बातमी लवकरच जनतेसमोर आणुन दुध का पाणी का पाणी.
हे
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात बऱ्याच वर्षांपासून सट्टा, पत्ता, गावठी दारू निर्मिती व विक्री तसेच देशी व इंग्लिश दारुच्या विक्रीसह अनेक प्रकारचे अवैध धंदे बोकाळले आहेत. हे अवैध धंदे करणारे व्यावसायीक कुऱ्हाड गावातील हमरस्त्यावर, भरवस्तीत तसेच पान टपरीवर, रहदारीच्या ठिकाणी, धार्मिक स्थळांजवळ अवैध दारु विक्रीसह सट्टा, पत्त्यांचे अड्डे चालवतात. या कारणांमुळे गावातील अल्पवयीन, लहान, थोर मंडळी व्यसनाच्या आहारी जात असल्याने गावात अशांतता पसरली असून गावात दररोज लहान, मोठी भांडणे होत असतात. तसेच या अवैध धंद्यांचे बाबतीत मागील काही वर्षांपासून संबंधित विभागाकडे वारंवार अर्जफाटे करुन सुध्दा काहि एक फायदा होत नसल्याने कुऱ्हाड खुर्द येथील महिला व पुरुषांनी संतप्त भावना व्यक्त करत अवैध धंदे बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.
(सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. कृष्णा भोये साहेब असतांना अवैध धंदे बंद करण्यासाठी दिलेले निवेदन)
कारण या अवैध धंद्यामुळे आजपर्यंत बरेचसे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन बऱ्याचशा तरुणींनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच बऱ्याचशा तरुणांचा अति मध्यसेवनाने मॄत्यू झाले आहेत. तसेच बरेचसे कुटुंबप्रमुख ऐन उमेदीच्या काळात मॄत झाल्यामुळे बरीचशी कुटुंब उघड्यावर आलेली आहेत. आतातर अवैध धंदे करणारांची कहरच केला असून यांच्या विरोधात बोलणारांना दमदाटी तसेच मारठोक करण्यापर्यंत मजल गाठली आहे.
म्हणून आता कुऱ्हाड खुर्द येथील महिला वर्ग, पुरुष वर्ग, नवतरुण मंडळी व सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीकडे मागणी केली आहे. म्हणून या तक्रारीची दखल घेत मागील आठवड्यात कुऱ्हाड येथील सुज्ञ नागरिकांनी पाचोरा येथील डी. वाय. एस. पी. या. श्री. भरतजी काकडे साहेब यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती समजून सांगत कुऱ्हाड गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठीचे निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे.
या तक्रारीची दखल घेत डी. वाय. एस. पी. भरतजी काकडे यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सुचना देऊन कारवाई करण्यासाठी सांगितले होते. त्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन कडून धाडसत्र सुरू करण्यात आले असून आतापर्यंत तीन हातभट्टी निर्मीतीच्या भट्ट्या फोडण्यात आल्या आहेत. तसेच जसजशी माहिती मिळेल तसतशी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मात्र एकीकडे धाडसत्र सुरु असल्यावर ही हे अवैध धंदे करणारे व्यावसायीक कारवाईला जुमानत नसून पोलीस कारवाई करुन जात नाही तोपर्यंत पुन्हा त्याच जागेवर, त्याच परिसरात पुन्हा आपले अवैध धंदे सुरु करत असल्याने कुऱ्हाड गावातील महिला, पुरुष, सुज्ञ नागरिक संतप्त झाले असून या अवैध धंदे करणारांवर कडक कारवाई होऊन सुरु असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पाचोरा डी. वायर. एस. पी. कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून जाहीर केले आहे.