भडगाव गटविकास अधिकाऱ्यांच्या हातात एकच प्याला, वरिष्ठ अधिकारी देतील का कारवाईचा टोला ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१०/२०२२

(एक सडी मछली पुरे तालाब को गंधा बना देती है)

आजच्या परिस्थितीत (सगळ्याच नाही) काही शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण करुन खऱ्याचे खोटं व खोट्याच खर केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जळगाव जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली असल्याने या तक्रारींमध्ये तथ्य आहे हे लक्षात येत असलातरी आजही असाच पैसे खाण्याचा प्रकार बऱ्याचशा शासकीय कार्यालयातून सुरु आहे व याच हरामाच्या कमाईवर (सगळेच नाही) काही लाचखोर अधिकारी व कर्मचारी मौजमस्ती करत असतात याचाच एक इरसाल नमुना भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या भडगाव पंचायत समिततीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बाबतीत समोर आला असून या प्रकाराबाबत सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

कारण पंचायत समिती म्हणजे ग्रामविकासाचा आत्मा तसेच गावागावांतील विकासकामे किंवा इतर शासकीय योजनाचे भांडार असलेले कार्यालय व या कार्यालयाचे मुख्य सुत्रधार गटविकास अधिकारी मग काय सगळच काही अलबेला असत असेच म्हणावे लागेल कारण भडगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष परंतु भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले वर्ग एकचे गटविकास अधिकारी हे जनतेला चोवीस तास सेवा देतांना त्यांना थकवा आल्यामुळे थकवा घालवण्यासाठी दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ बुधवार रोजी शासकीय कार्यालयात सेवा बजावत असतांनाच कार्यालयीन वेळेत भरदिवसा आपल्या सोबत काही सवंगड्यांना घेऊन कजगाव येथील हॉटेलमध्ये जाऊन दारुची पार्टी केली या पार्टीत दारु पितांनाचा फोटो व सविस्तर माहिती एका हितचिंतकांने सत्यजित न्यूज कडे देऊन या अश्या बेशिस्त व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या मागील कारणही तसेच आहे. कारण भडगाच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कमालच केली त्यांनी हॉटेलमध्ये जाण्यासाठी एम. एच. १९ एम. ०७४२ या क्रमांकाच्या चक्क शासकीय वाहानाचा वापर करत गाडी बिनधास्तपणे हॉटेलसमोर उभी करून दिवसाढवळ्या मित्रांसोबत दारुच्या पार्टीत सहभागी झाल्याचे बऱ्याचशा लोकांनी पाहिले व त्यांच्या या गैरवर्तणूकीबाबत संताप व्यक्त करत काही सुज्ञ नागरिकांनी आपापल्या मोबाईलमध्ये त्यांचे छायाचित्रण केले व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून या गैरप्रकाराबाबत वाचा फोडण्यासाठी विनंती केली आहे.

विशेष म्हणजे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशियाना यांनी नुकतीच भडगाव पंचायत समितीला भेट देऊन भडगाव तालुक्याचा दौरा केला होता. हा दौरा आटोपल्यानंतर लगेचच भडगावच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे जनतेतून कुतुहल निर्माण झाले असून या महाशयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची काही भिती आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


या प्रकाराबाबत कानोसा घेतला असता भडगाव पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील झालेली विकासकामे करतांना ती विकासकामे मर्जीतील लोकांना हाताशी धरून करुन घेत मोठ्या प्रमाणात टक्केवारीची घेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त असल्याने यांच्यासोबतच ही पार्टी सुरु होती अशी प्रथम माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे भडगाव पंचायत समितीवर झालेले भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे जाणवते म्हणून आतातरी या गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या