लोहारी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर दुचाकीस्वारास लुटण्याचा प्रयत्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२१
वरखेडी येथील कमलेश भटू शेठ सोनार (बाविस्कर) हे वरखेडी येथून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाचोरा शहराकडे जात असतांना लोहारी ते पाचोरा दरम्यान कधी काळी असलेल्या सपना हॉटेलचे जवळ काही अज्ञात व्यक्तींनी कमलेश सोनार यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून रस्ता लूट करण्याचा प्रयत्न केला.
मिरचीपूड डोळ्यात जातच कमलेश सोनार यांनी भांबावून गाडी थांबवली, गाडी थांबताच संबंधित रस्ता लुटीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी कमलेश सोनार यास रस्त्याचा बाजूला ओढून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कमलेश सोनार यांनी झटापट करत जोरजोरात आरडाओरड करत मदत मागितली व याच वेळात या रस्त्यावरून दुसरे वाहन येतांनाचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेत कमलेश सोनार यांना चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मुक्का मार लागला असून थोड्याफार जखमा झाल्या असल्याने त्यांनी लागलीच पाचोरा येथे जाऊन उपचार घेत पाचोरा पोलीस स्टेशनला संपर्क साधला असल्याचे कळते. सविस्तर वृत्त उद्या सकाळी.
(कमलेश सोनार हे सोने, चांदीचा वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत. ते मुळचे वरखेडी येथील रहिवासी असून हल्ली मुक्काम पाचोरा स्थीत आहेत. ते व्यवसायानिमित्त वरखेडी पाचोरा येत, जात असतात चोरट्यांनी नेमके त्यांच्या दैनंदिन घडामोडींचा आभ्यास करुन त्यांच्यावर पाळत ठेवून आजचा रस्ता लुटीचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला आहे.
मात्र हे रस्ता लूट करणारे जवळपासच्या गावातीलच असावे असा अंदाज सूज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.)