लोहारा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गुरांचे वाचविले प्राण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२१
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर रोजी लोहारा गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक ४०७ टेम्पो उभा होता, त्यात महेंद्र घोंगडे व आप्पा चौधरी यांनी बघितले असता, त्यांना अमानुषपणे गुरांची वाहतूक करतांना आल्याचे दिसून आले. तसेच सदरील गुरे ही कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय आल्याने बजरंग दल कार्यकर्त्यांनी गाडीच्या ड्रायव्हरला विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर शंका निर्माण झाली.
म्हणून बजरंग दलचे संयोजक महेंद्र घोंगडे यांनी लोहारा येथील हेमंत गणेश गुरव यांना फोन वरून सगळ्या घटनेची माहिती दिली असता त्यांनी गाडी लोहारा आऊट पोस्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे सांगितले. हेमंत गणेश गुरव यांनी तात्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कृष्णा भोये साहेब, वरिष्ठ पोलीस अधिकारी ॲडिशनल एस. पी. व जिल्हा पोलीस अधीक्षक चाळीसगाव डिव्हीजनचे श्री. रमेशजी चोपडे साहेब, तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकार श्री.भरतजी काकडे साहेब, यांच्याशी फोनवरून संपर्क करून सदर विषयाची सविस्तर माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचने नुसार सदरील गुरांची गाडी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे.
यात जमा केलेल्या गाडीचा तसेच गुरांचा सविस्तर पंचनामा करून सदरील ६ गुरे (बैल) हे वरखेडी येथील महावीर गौशाळेत रवाना करण्यात आले आहेत, तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे श्री.अरुण राजपूत यांच्या फिर्यादीवरून ०३३५/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहारा येथील रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष नथ्थु कोळी, लोहारा बजरंग दल शाखा संयोजक महेंद्र दिलीप घोंगडे, सह संयोजक राहुल भास्कर चौथे, तसेच लोहारा गौ,रक्षा प्रमुख गजानन माधव चौधरी हे साक्षीदार आहेत. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार श्री.अरविंद मोरे हे करीत आहेत.