केबल वायर चोरी प्रकरणातील तीन आरोपी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कस्टडी

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०२/२०२३
पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील डांभुर्णी येथील शांतीलाल परदेशी व संजय परदेशी यांच्या शेतातील विद्युत पंपाची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना मागील वर्षी घडली होती. या चोरी बाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ८२/२०२२ भा. द. वी. कलम ३७९ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
केबल वायर चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यापासून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी गोपनीयता बाळगत चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. या प्रयत्नांना यश येऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी विशाल संकट, विजय हतांगळे व दशरथ हतांगळे या संशयित केबल चोरट्यांना चोरीली केबल वायर (मुद्देमालासह) शिताफीने अटक करुन पाचोरा मा. न्यायालयात हजर करत इतर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार मा. न्यायालयातर्फे संशयित तिघ आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केबल वायर चोरी करणारांना पकडल्यामुळे इतर बरेचसे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून वरखेडी गावाजवळ असलेल्या भोकरी, शेंदुर्णी, पिंपळगाव हरेश्र्वर येथील भंगार व्यवसायाच्या नावाखाली चोरीची केबल वायर व इतर वस्तू घेणारांचे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब, मा. श्री. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री. अभयसिंह देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, पोलिस नाईक अरुण राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित निकम, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांनी केली आहे.