पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर दुचाकी समोरासमोर धडकल्या एकाचा जागेवरच मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२२
पाचोरा ते मोंडाळा रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एका दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना दिनांक १९ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा ते मोंडाळा रस्त्यावरील म्हसोबा बाबा मंदिराजवळ दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या एम.एच.१९/ डी.ई.३२९६ व एम.एच.२१/ए.ए. २५३९ या दोन दुचाकींंची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघात सातगाव डोंगरी येथील सागर विजय परदेशी वय वर्षे (२८) जागीच मृत्यू झाला असून यमराज धर्मराज पाटील, गणेश भीमराव पाटील व गोपाल हारसिंग पाटील हे अंतुर्ली येथील तीघ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातातील दोघ दुचाकांचा खुर्दा झालेला आहे.
या अपघाताबाबत पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.