मनोजच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जुगाराच्या अड्डा मालका विरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने मनोजचे कुटुंबीय हतबल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील १९ वर्षीय मनोज चत्रू जाधव या तरुण मुलाने कुऱ्हाड येथील जुगाराच्या अड्डावर जाऊन जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या मालकाकडे मोबाईल गहाण ठेवून तसेच व्याजाने रक्कम घेऊन ते पैसे जुगारात हरल्याने शनिवार रात्रीच्या सुमारास भवानीच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
कुऱ्हाड गावात सुरू असलेले अवैध धंदे याचे मूळ कारण आहे.त्यात गावात सट्टा,पत्ता,देशी विदेशी,गावठी दारूमुळे अनेक तरुणांचे संसार उघड्यावर येत आहेत. गेल्या पंधरवड्यातील ही तिसरी घटना आहे. यात दारूच्या व्यसनाने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता आणि जुगारात पैसे हरल्याची ही तिसरी कालची घटना आहे.
पिंपळकोठा ता पारोळा येथील रहिवासी चत्रु नारायण जाधव हा कुऱ्हाड तांडा येथे शालका च्या गावात पोट भरण्यासाठी कुटुंब सह अनेक दिवसांपासून आले होते. त्यांना चार अविवाहित मुले असून मनोज हा तीन नंबरचा होता ,मजुरी तसेच शेळ्या चारून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब होते. परंतु मनोजला पत्त्याचा नाद असल्याने त्याने आपला मोबाईल गहाण ठेवून जुगारात पैसे हरला. घरी वडील रागावतील म्हणून त्याने थेट जंगलाचा रस्ता धरला,ज्या ठिकाणी जाण्यास रस्ता देखील नाही अशा दाट निर्जन ठिकाणी त्याने रात्रीच्या वेळेस गळफास घेऊन आत्महत्या केली .इकडे परिवाराने रात्रभर शोधा शोध करून मनोज मिळून आला नाही.रविवारी दुपारी गुरख्याना तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.
गावात सद्या सट्टा,पत्ता,दारू मुळे तरुण पिढी नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असून पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी कुऱ्हाड ग्रामस्थांकडून होत आहे.तसेच हे अवैध धंदे आता तरी बंद होतील का असा संतप्त सुर महिला वर्गातून निघत आहे. खालील चित्रात १ मनोज चे घर व शोकाकुल परिवार,२ मनोज ने गळफास घेत असलेले ठिकाण व लटकलेल मृतदेह ३ मनोज च फोटो