लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२१
लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळल्यास होणार ५०० रूपये दंड. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश
जळगाव दिनांक १७/०२/२०२१ सार्वजनिक आरोग्य विभाग , मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक १४ मार्च , २०२० अन्वये करोना विषाणू ( कोव्हिड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा , १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत . आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोविड -१९ विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १७/०२/२०२१ रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिलेले आहेत . तसेच जळगांव जिल्हयात करोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे आणि सदर संशयित व्यक्तीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती जळगांव जिल्हयात उद्भवू नये यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे . त्याअर्थी , मी . अभिजीत राऊत , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव आपत्ती व्यवस्थापन कायदा , २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम , १८९७ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगांव जिल्हयात करोना विषाणू ( कोव्हिड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून या कार्यालयामार्फत वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या सुचना विचारात घेऊन पुढील आदेश होईपावेतो खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे .