पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांचा माणुसकी समूहातर्फे सत्कार संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२३
खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या पहुर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांचा सत्कार माणूसकी समूहाचे मनोज जोशी, सुमित पंडित, गजानन क्षीरसागर, रमेश लिंगायत आदी सदस्यांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन नुकताच करण्यात आला.
“पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप”
संभाजीनगर, वेदांत नगर व बेगमपुरा पोलीस स्टेशनला काम करत असतांना मी माणूसकी समुहाचे समाजसेवेचे काम अगदी जवळून पाहिले असून माणूसकी समूहाने खरच समूहाच्या नावाप्रमाणे कित्येक बेवारस, मनोरुग्ण व गरजूंना आधार देऊन त्यांना परत माणूस म्हणून जगण्याची संधी व उमेद निर्माण करुन दिली हे काम वाखाणण्याजोगे आहे. असे सांगितले व माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत माझी काही मदत लागल्यास योग्य ती मदत मी करेल अशी ग्वाही दिली व आपण माझा सत्कार करुन तुम्ही मला उत्साहीत केले नक्कीच मी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्न करुन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध राहील असे मा. श्री. सचिन सानप यांनी सांगितले.
“माणूसकी समुहाचे आवाहन”
आपण बंदोबस्त कामी असतांना पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत व परिसरात आपणास कुठेही मनोरुग्ण किंवा बेवारस व्यक्त आढळून आल्यास आम्हाला कळवा आमची माणूसकी समुहाची टिम सदैव धाऊन येईल असे आश्वासन सत्कार समारंभ प्रसंगी माणूसकी समुहातर्फे देण्यात आले.