पाचोर्यात ७ लाखांचा गुटखा पकडला, द्देमालासह संशयितास अटक अन्न भेसळ प्रशासनाची कामगिरी.(सखोल चौकशीची मागणी)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२२
टीमचा कर्णधार पकडला परंतु इतरांचे काय ?
पाचोरा शहरात दोन दिवसांपूर्वी सिंधी काॅलनी भागात संशयित रित्या उभ्या असलेल्या वाहनांमध्ये गुटखा आढळुन आल्याने अन्न भेसळ प्रशासन जळगाव व नाशिक या दोन्ही पथकांनी संयुक्तिक कारवाही करत ७ लाखांचा गुटखा जप्त करित एका संशयितास ताब्यात घेत गुन्हा नोंदविणायात आला असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत प्राप्त माहीती अशी की, नाशिक येथिल अन्न सुरक्षा अधिकारी तथा गुप्त विभागाचे अविनाश दाभाडे आणी जळगाव येथिल अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना शहरातिल सिंधी काॅलनी भागात एम.एच. १९ ही.वाय. ००८९ (छोटा हत्ती) व एम.एच. १५ ही.एम. ८०२० (मारूती ओमनी) ही दोन वहाने संशयास्पद रित्या आढळुन आले होते.
त्यांनी या वाहनांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात बंदी घातलेला गुटखा पानमसाला आढळुन आला. सदर मालाची किंमत ७ लाख ७ हजार १९५ रूपये असुन दोन्ही वाहनांसह १० लाख ४७ हजार १९५ किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या मुद्दूमालासह सनी नामक एका तरूणास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अन्न सुरक्षा मनके कायद्यान्वये किशोर साळुंखे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरात अशा स्वरूपाचा माल कुणीही वाहतुक करत असेल किंवा साठवणुक करत असेल तर अन्न सुरक्षा प्रशासनाला कळवावे असे अवाहन अविनाश दाभाडे आणी किशोर साळुंखे यांनी यिवेळी केले असुन शहरातिल भडगाव रोडसह इतर भागात जर अशा स्वरूपाचे कृत्य करत असेल तर कारवाही करूच अशीही माहीती त्यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाचे ~ पाचोरा शहरातील गुटखा प्रकरणी सनी नामक युवकाला अटक करण्यात आली असली तरी सनी नामक युवक हा गुटखा व्यवसायातील टीमचा मुख्य कर्णधार असुन याची सखोल चौकशी करून टीममधील इतर सदस्यांची धरपकड केल्यास अजूनही मोठ्या प्रमाणात लपवून ठेवलेला गुटखा हस्तगत केला जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा पाचोरा शहरासह गावपातळीवर होत आहे.
कारण अजुनही पाचोरा तालुक्यातील लोहारा, पिंपळगाव हरेश्र्वर, वरखेडी तसेच जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी, पहूर या शहरासह लहानमोठ्या गावात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु असुन याबाबत सविस्तर चौकशी होऊन संपूर्ण पाचोरा तालुका गुटखा मुक्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.