श्रम आणि एकतेतुन विविधता आणि त्यातुन विकास हाच खरा मंत्र, आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांचे प्रतिपादन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०२/२०२२
श्रम आणि एकतेतुन विविधता आणि त्यातुन विकास हाच खरा मंत्र आहे. ख-या श्रमाच मोल म्हणजे अशक्य ते शक्य करणं शेतक-याच्या विकासासाठी आणि समृध्दीसाठी विविध पिकाचा अवलंब करुन श्रमपूर्वक कष्ट करुन सुखाचा मार्ग जवळ करण याच उत्तम उदाहरण समाधन मालकर व त्यांच्या दोन्ही भावांनी त्यांच्या अटलगव्हाण शिवारातील शेतावर १६ एकर क्षेत्रावर १६ विविध पिकांची पेरणी व लागवड करुन यांत्रिकीकरणावरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रयोगशिलततुन फुलविलेल्या शेतावर आज जिल्हा स्तरावरील कृषि विभागाच्या अधिका-यांना व परिसरातील व तालुक्यातील शेतक-यांना आज प्रत्यक्ष पिक पहाणीच्या कार्यक्रमांसह कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यंत्रणेच्या तालुका स्तरीय समितीच्या मासिक सभेच आयोजन मालकर भावंडांनी भाग पाडल हे त्यांच्या श्रमाचं कौटुंबिक एकतेच आणि विविध पिकांचा अवलंब करुन साधलेल्या आर्थिक उन्नतीच्या प्रगतीच प्रतिक असल्याचा त्यांच्या या श्रमाच मोल म्हणुन अॅग्रोवर्ल्ड जाहीर करीत असलेल्या राज्यस्तरीय पंधरा पुरस्कारामध्ये या मालकर भावंडांचा कौटुंबिक समावेश होण्यास हरकत नाही असे प्रतिपादन पाचोरा -भडगांव विधान सभा क्षेत्राचे लाडके आमदार आप्पासाहेब मा.श्री. किशोर पाटील यांनी केल.
सदर कार्यक्रमामध्ये मधुकर चौधरी कृषि उपसंचालक यांनी शासनाच्या विविध योजना आत्मा समितीचे कार्य यांविषयी व रमेश जाधव यांनी विविध योजनांचा परामर्श घेत रुंद सरी वरंबा पद्धतीचा अनुभव कथनासह त्यांची परिणामकारता विशद केली आणि शैलेंद्र चव्हाण यांनी ॲग्रोवर्ल्डच्या माध्यमातुन ११ शेडनेट / पॉलिहाऊसमधुन विविध भाजीपाला उत्पादन करुन ढोबळी मिरची पिकातून चांगला फायदा होतो त्यांचा अवलंब करणे व दिनांक ११ मार्च ते १४ मार्च २०२२ या कालावधीसाठी आयोजित शेतकरी मोळावा / कृषि प्रदर्षनांत सहभागी होण्याचे आवाहन केले शिवाय शेतक-यांना ९१३००९१६२१/२२/२३/२४/२५ या क्रमांकावर फोन करुन कृषि विषयक सल्ला विनामुल्य उपलब्ध होईल शिवाय आपला समावेश व्हाट्सअॅप समुहामध्ये होऊन आपणास नियमित शेती विषयक संदेश प्राप्त होतील असे प्रतिपादन केले.
दिनांक १८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यंत्रणेच्या तालुका स्तरीय समितीच्या मासिक सभेच शेतकरी प्रशिक्षणाच आणि शिवार फेरीच आयोजन नोवेल सिड्स प्रा.लि. कंपनी व कृषि विभाग आणि समाधान मालकर बंधु यांच्या संयुक्त विद्यमाने समाधान रघुनाथ मालकर यांच्या अटलगव्हाण शिवारातील शेतावर केल असता आ. आप्पासाहेक किशोर पाटील हे अध्यक्ष पदावरुन बोलत होत. या कार्यक्रमालां मधुकर चौधरी, कृषि उपसंचालक, आत्मा-जळगांव रमेश जाधव तालुका कृषि अधिकारी, पाचोरा शैलेंद्र चव्हाण ॲग्रोवर्डचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र बाफना, आत्मा तालुका अध्यक्ष, आत्मा कमिटी सदस्य अरुण पाटील अध्यक्ष, जिल्हा शेतकरी सेल, शेतकरी बचत गट सातगांव डोंगरी यांचे विजय राजपुत, अंबे वडगाव येथील कायदेतज्ज्ञ मंगेशराव गायकवाड यांचेसह सात सदस्य कोल्हे- अटलगव्हाण व आंबे वडगांव येथिल सरपंच व परिसरातील आणि तालुक्यातील व परिसरातील सुमारे १२५ शेतकरी आणि कृषि विभागाचे तालुक्यातील संपुर्ण अधिकारी / कर्मचारी वृंद उपस्थित होता.