शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, उदघाटन सोहळ्याचे शनिवारी आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा दिनांक २९ जानेवारी २०२२ शनिवार रोजी खासदार माननीय दादासो उन्मेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या उदघाटन सोहळ्याचे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून
जिल्हापरिषद अध्यक्षा जळगाव मा.ना.साहेब रंजना प्रल्हाद पाटील, पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील, आमदार तथा भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष जळगावचे मा.श्री. सुरेश भोळे, जिल्हापरिषद जळगावचे उपाध्यक्ष मा.श्री. लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगावचे मा.श्री. पंकजजी अशिया, पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड गटाचे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ पाटील.(काटे), भा.ज.पा.तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोलभाऊ शिंदे, आरोग्य अधिकारी जिल्हापरिषद जळगावचे डॉ. मा.श्री. भिमाशंकर जमादार, जिल्हापरिषद सदस्या सौ.विजयाताई पाटील, पंचायत समिती सदस्य मा.श्री. वसंतराव गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती मा.सौ.अनिताताई चौधरी, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री. सुभाष पाटील, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री. बंन्सीलाल पाटील, पाचोरा पंचायत समितीच्या माजी उपसभापती मा.सौ.रत्नप्रभाताई पाटील, माजी उपसभापती सौ.अनिताताई पवार, तालुका आरोग्य अधिकारी मा.श्री. समाधान वाघ, वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. मा.श्री. शेखरदादा पाटील, शाखा अभियंता मा.श्री. पी.बी.पाटील, हे उपस्थित रहाणार आहेत.
तरी पंचक्रोशीतील जनतेने या उदघाटन सोहळ्यात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती शिंदाड गावचे प्रथम नागरिक सरपंच मा.श्री. ज्ञानेश्वर भाऊ तांबे व उपसरपंच मा.श्री. नरेंद्र भाऊ पाटील सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.