संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण मिमरोट (मोची) यांची निवड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२२
पाचोरा येथे संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. सदरील बैठकीस संस्थापक अध्यक्ष श्री. खंडू पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा घडवून आली. सर्वात महत्त्वाचा पाचोरा येथील चर्मकार समाज मंदिराच्या जागेवर लवकरच भूमिपूजन करून संत शिरोमणी गुरु रविदास यांचे मंदिराचे निर्माण करण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.
याप्रसंगी संपूर्ण तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरणात होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सभा पार पडली. याप्रसंगी संत रविदास निर्माण कार्याचे प्रमुखपदी सावखेडा येथील धडाडीचे कार्यकर्ते चर्मकार समाज युवानेते श्री रामकृष्ण मिमरोट (मोची) यांची तर शहराध्यक्षपदी किरण जाधव सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष खंडू पवार उपाध्यक्ष उत्तम सोनवणे खजिनदार शैलेंद्र पवार मनोहर जोनवाल यांनी नियुक्त पत्रदिले याप्रसंगी तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष- रामकृष्ण मिमरोट(मोची), उपाध्यक्ष-अमरसिंग वाघमारे, सचिव- गुरुलाल पवार, कायदेशीर सल्लागार रमेश पवार, सदस्य-अनिल पवार, सुरेश बोहरे, नारायण पवार, फकीरा गांगे, गोवर्धन जाधव, विशाल लोंढे, दीपक पवार,यांची निवड करण्यात आली शहराध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष- किरण गायकवाड, सचिव घनश्याम आंदोरे, खजिनदार- गोपाल मोरे सल्लागार- भारत पवार यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविक नंदलाल आगारे यांनी केले तर सूत्रसंचालन गोपाल मोरे यांनी केले. वरील बैठकीस पाचोरा शहर व तालुक्यातून समाज बांधव बंधू-भगिनी उपस्थित होते