अॅड.अविनाश भालेराव यांचे वाढदिवसा निमित्त ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२१
पाचोरा येथील रहिवासी तसेच जळगाव काॅग्रेसचे उपाध्यक्ष तथा पाचोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड.अविनाश भालेराव यांचे वाढदिवसा निमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान दिले.
जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ,माजी नगर सेवक अविनाश भालेराव यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने काल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळया जवळ रक्तदान शिबिर घेण्यात आले.सदर रक्तदान शिबिर अविनाशभाऊ मित्र मंडळ व रेडप्लस ब्लड बँक जलगांव यांनी आयोजन केले होते. यावेळी ५२ लोकांनी रक्त दान केले.
महाराष्ट्र शासनाने कोविड काळात राज्याला रक्ताची गरज असल्याचे जाहिर केले असल्याने या आवहानाला प्रतिसाद देत लोकांनी मोठ्या संखेने येऊन रक्तदान केले सकाळी ११ वाजेपासुन सायंकाळपर्यंत शिबिर सुरु होते ,यावेळी अॅड.अविनाश भालेराव,माजी शिवसेना शहर प्रमुख भरत खंडेलवाल,संदीप महाजन आदी मान्यवर उपस्थितित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन राजू अहिरे,अविनाश पवार,रहमान देशमुख,लखन वाघ, अमोल गायकवाङ, अविनाश खैरनार,आर्यन मोरे , दिपक सोनवणे, धीरज खेड़कर ,दीपक गायकवाड़ ,शकलेन शेख ,रितिक ब्राम्हणे यांनी केले तर रेडप्ल्सस जळगावचे डॉ. विवेक महाजन ,डॉ. भरत गायकवाड़,प्रकाश सपकाळ यानी सहकार्य केले. अविनाश भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त तरूणांनी उत्सुर्तपणे या शिबिरात भाग घेउन रक्तदान केले.