दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२३

पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, जामनेर व जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बॅंकिंग क्षेत्रातील ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेली तसेच पंचक्रोशीतील व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराचे केंद्रबिंदु म्हणून ओळख असलेल्या दि पाचोरा पिंपल्स को ऑपरेटिव्ह बॅंकेचा ५८ वा वर्धापन दिवस आज दिनांक १७ डिसेंबर २०२३ रविवार रोजी बॅंकेचे चेअरमन ॲड. अतुल भाऊ संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हाइस चेअरमन प्रशांतजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली
मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शुभप्रसंगी येणाऱ्या २०२४ या वर्षासाठीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

********************************************************
बॅंक जिल्ह्यात यशोशिखरावर नेऊ व्हाइस चेअरमन प्रशांतजी अग्रवाल यांची ग्वाही.
********************************************************

जिल्हाभरात बॅंकिंग क्षेत्रात आपल्या कामाचा आगळावेगळा असा ठसा उमटवणाऱ्या पाचोरा तालुक्यातील, पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी, छोट्या, मोठ्या उद्योजकांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने १६ डिसेंबर १९६५ रोजी पाचोरा शहरातून दि पाचोरा पिपल्स को ऑपरेटिव्ह बॅंके स्थापना करण्यात आली. या बॅंकेच्या माध्यमातून पाचोरा शहरासह भडगाव, नगरदेवळा, शेंदुर्णी, जामनेर, जळगाव येथे व्यवसायीक जाळे पसरवित यशस्वीतेची पताका सर्वदूर पसरली हे करत असतांनाच मागील काळात बॅंकिंग क्षेत्रात अचानक आलेल्या वादळातही डगमगून न जाता संस्थेच्या व ग्राहकांच्या भल्यासाठी आपल्या तत्वांना घट्ट पकडून ठेवल्यामुळे आज हा वटवृक्ष ५८ वर्षाचा झाला असून हे बॅंकेच्या ग्राहकांच्या सहकार्याचे फलीत असल्याचे मत व्हाइस चेअरमन प्रशांतजी अग्रवाल यांनी व्यक्त केले. तसेच बॅंकेच्या कामकाजावर विश्वास ठेवणाऱ्या भागधारक, ग्राहक व हितचिंतकांचे चेअरमन ॲड. अतुल भाऊ संघवी व व्हाइस चेअरमन प्रशांतजी अग्रवाल व संचालक मंडळाने आभार व्यक्त करत
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले या प्रास्ताविक भाषणात त्यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आलेख वाचन करुन दाखवला तसेच बॅंक देत असलेल्या विविध सेवा, सुविधांची माहिती दिली तसेच पुढील काळात बॅंकेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बॅंकिंग क्षेत्रातील स्पर्धेत आपण अग्रेसर कसे राहू यावर भर दिला जाईल असे सांगून जिल्ह्यातील बॅंकिंग क्षेत्रात आपल्या बॅंकेचे नाव अग्रस्थानी घेतले जाईल असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

“मासिक रिकरिंग ठेव योजनेची घोषणा”
दि पाचोरा पिंपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा ५८ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सोबतच बॅंकेची स्थापना ही सन १९६५ साली झाली असल्याने १९६५ रुपयांची मासिक ठेव योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेत १९६५ रुपयांची रक्कम १२० महिने नियमितपणे भरणाऱ्या ग्राहकाला ३०००००/०० लाख ६१०००/०० रुपयांचा परतावा देण्यात येईल अशी माहिती दिली तसेच बॅंकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.